औरंगाबादेत आता किराणा, भाजीपाला विक्रीसह अत्यावश्यक सेवा दुपारी एक वाजेपर्यंतच सुरू

0
126
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात  किराणा दुकाने, भाजी मंडई, गॅस सिलिंडरचा पुरवठा, दूध डेअरी इत्यादी आवश्यक सेवा सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आधी ही वेळ सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत होती. सर्वसामान्य नागरिकांना दुपारी १ वाजेपर्यंत पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळणार आहे.

राज्य सरकारने सुरू केलेल्या ब्रेक दि चेन मोहिमेत भाजीपाला विक्री, किराणा दुकाने, दूध डेअरी इत्यादींचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून या अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. शिवाय स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन या वेळांमध्ये बदल करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला दिले होते. 

बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता किराणा, भाजीपाला,फळे, डेअरी,बेकरी, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थांची दुकानेपार्सलसेवा,चिकन,मटण,अंडी,मासे, पोल्ट्री दुकाने, गॅस सिलिंडर पुरवठा,ॲटोमोबाईल्स दुकाने, गॅरेज  इत्यादी अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंतच खुली ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला असून हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू राहील. नव्या आदेशानुसार जिल्ह्यात आठवडी बाजार भरवण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

ऑप्टीकल्सचष्मा दुकाने, पशुवैद्यकीय दवाखाने,पाळीव प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी, पशुखाद्याची दुकाने, पाळीव प्राण्यांची सेवा देणारी दुकाने, कृषि संबंधित सेवा – बियाणे, खते, अवजारे व त्यांची दुरुस्ती इत्यादी दुकानेही सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत याच वेळात सुरू राहतील.

आरोग्य सेवा, वीज, पाणी, बँकींग, वित्तीय सेवा, आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात १०० टक्के उपस्थिती राहील. स्थानिक प्राधिकरणाच्या अत्यावश्यक सेवा २४ तास  सुरू  राहतील. इतर शासकीय कार्यालयांत ५० टक्के उपस्थिती राहील. खासगी कार्यालये बंद राहतील.

 पेट्रोलही मिळणार दुपारी १ वाजेपर्यंतचः पेट्रोल पंप व पेट्रोलियमशी संबंधित उत्पादन, कार्गो सेवा, डाटा सेंटर्स/क्लाउड सर्व्हिस पुरवठादार/माहिती व तंत्रज्ञान सेवेशी संबंधित सेवा, शासकीय/खाजगी सुरक्षा सेवा, गॅरेजेस, टायर पंक्चर दुकाने, दूरसंचार सेवा सुरळित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी/सेवा या अत्यावश्यक सेवेसाठी २४ तास सुरू राहतील. सर्वसामान्य नागरिकांना मात्र सकाळी ७ ते दुपारी १ यावेळेत पेट्रोल पंपावर पेट्रोल-डिझेल मिळेल.

दूध- फळे विक्रीही दुपारपर्यंतचः मुस्लीम बांधवाचा रमजानचा महिना लक्षात घेऊन दूध व फळे यांचेशी संबंधित दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत याच वेळेत सुरू राहणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा