१८ वर्षांवरील सर्वांचे होणार लसीकरण, केंद्राचा निर्णय; पण राज्यांना मोजावे लागणार लसीचे पैसे

0
57

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने फैलावत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली असतानाच देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या १ मेपासून हे लसीकरण सुरू होणार आहे. विशेष म्हणजे आता लसीकरणातून केंद्र सरकारने अंग काढून घेतले असून राज्य सरकारांना थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लस विकत घेण्याची मुभा दिली आहे.

पाच राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुका, हरिव्दारमधील कुंभमेळा आणि देशातील काही भागात प्रचंड वेगाने वाढणारी कोरोना रूग्णसंख्या यामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती हाताबाहेर जाणार, हे लक्षात येताच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज, सोमवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यानुसार लस उत्पादक लसीचे ५० टक्के डोस केंद्र सरकारला पुरवतील आणि उर्वरित ५० टक्के डोस राज्य सरकारे किंवा खुल्या बाजारात विकण्यास स्वतंत्र असतील, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारांना लस उत्पादक कंपन्या ठरवतील, ती किंमत मोजून लसीचे डोस विकत घ्यावे लागणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा