राज्यात शाळांपाठोपाठ वसतिगृहेही होणार सुरू

0
39
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यात सोमवारपासून महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने शाळा सुरू होत असून शाळांच्या पाठोपाठ वसतिगृहे देखील सुरू करावीत, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाला दिले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तसेच जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभाग व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्या-त्या ठिकाणी कोरोनाची परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा व त्याला अनुसरून सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व निवासी शाळा सुरू कराव्यात. यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिले आहेत.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. अनेक ठिकाणी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असून सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये व निवासी शाळांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता त्या-त्या स्थानिक प्राधिकरण व जिल्हा प्रशासनाने स्थानिक नियमावलीला अनुसरून व आवश्यक काळजी घेऊन वसतिगृहे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुंडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा