राज्यात लॉकडाऊनला नवा पर्यायः ‘ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स’ म्हणजे नेमके काय? सविस्तर वाचा

0
805
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊनऐवजी ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स लावले जातील, असे संकेत दिले आहेत.

राज्यातील नवीन कोरोना विषाणू सद्यस्थिती व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक तथा आरोग्य सेवेचे आयुक्त एन. रामास्वामी यांच्यासह दुरदृश्य प्रणालीव्दारे कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. अजित देसाई उपस्थित होते.

हेही वाचाः राज्यात आता लॉकडाऊन नाही तर ‘ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स’, उच्चस्तरीय बैठकीनंतर टोपेंची माहिती

याबैठकीनंतर टोपे यांनी राज्यात ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स लावण्याचा प्रस्ताव टास्क फोर्सने दिल्याची माहिती दिली. त्यानंतर ऑगमेंटेंड रिस्ट्रिक्शन्स म्हणजे नेमके काय? अशी चर्चा सुरू झाली. जाणून घेऊया या  नव्या संकल्पनेविषयी…

ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स म्हणजे नेमके काय?

ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स म्हणजे वर्धित निर्बंध म्हणजेच वाढीव निर्बंध. याचाच अर्थ अनावश्यक सेवा किंवा गोष्टी बंद केल्या जातील. ज्या गोष्टींमुळे दैनंदिन जीवनावर काही फरक पडणार नाही किंवा काही अडणार नाही अशा अनावश्यक गोष्टी बंद करणे म्हणजेच ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

टास्क फोर्सने दिलेल्या ऑगमेंटेड रिस्ट्रिक्शन्स लागू करण्याच्या प्रस्तावानुसार राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू होण्याची दाट शक्यता आहे. शनिवार आणि रविवार असे दोन दिवस राज्यात कडकडीत लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता आहे.

विकेंड लॉकडाऊनच्या काळात सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना पूर्णतः बंदी राहील. धार्मिक स्थळे, चौपाट्या, उद्याने या काळात पूर्णतः बंद राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः तदर्थ प्राध्यापकांच्या सुरस कथाः नाट्यशास्त्रात अपात्र बंडगरांच्या नियुक्तीचा अवैध ‘एकपात्री प्रयोग’

शाळा, महाविद्यालये आणि पर्यटनस्थळे अशा गर्दीच्या ठिकाणांहून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे या परिसरात जमावबंदी आदेश लागू केले जाण्याची शक्यता आहे.

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव टाळण्यासाठी सोमवार ते शुक्रवार या काळात रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे. आज झालेल्या बैठकीत या सर्व शक्यतांवर चर्चा करण्यात आली. मात्र त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा