BigBreaking: औरंगाबाद जिल्ह्यातील लॉकडाऊन स्थगीत!

0
563

औरंगाबाद: कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात ३१ मार्च ते ९ एप्रिलदरम्यान लागू केलेला लॉकडाऊन स्थगीत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आज रात्री पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कोरोना संसर्गाच्या टॉप टेन जिल्ह्यात औरंगाबादचाही समावेश आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे होते. त्यामुळे ३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.
लॉकडाऊनच्या प्रशासनाच्या निर्णयाला लोकप्रतिनिधीनी आजच जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीत विरोध केला होता. एमआयएमने लॉकडाऊनच्या विरोधात उद्या बुधवारी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावून पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन स्थगीत करण्यात आल्याची घोषणा केली. प्रधान सचिवांशी याबाबत चर्चा झाल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा