कोरोनाचे संकटः राज्यात कठोर निर्बंध लागू, होम क्वारंटाइन व्यक्तीच्या घरावर लावणार फलक

0
200
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढू लागल्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.  कार्यालयातील उपस्थिती ५० टक्क्यांवर आणण्यात आली आहे. विशेष म्हणजे यावेळी होम क्वारंटाइन व्यक्तीच्या घरावर फलक लावण्यात येणार आहे. नवीन कडक निर्बंध पुढील प्रमाणेः

  • होम क्वारंटाइन असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर शिक्का मारणे बंधनकारक. घरावरही तसा फलक लागणार. कुटुंबातील अन्य व्यक्तींनी बाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक कारणासाठी घराबाहेर पडल्यास मास्क वापरावा. नियम मोडल्यास होम क्वारंटाइन व्यक्तीला तातडीने जवळच्या कोविड केअर सेंटरमध्ये हलवणार.
  • कोणत्याही राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाला परवानगी असणार नाही.
  • लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी असेल. अंत्यविधीसाठी केवळ २० लोकच उपस्थित राहू शकतील. मंगल कार्यालयात केवळ लग्नासाठीच जागा देता येईल. अन्य कार्यक्रमास मंगल कार्यालय उपलब्ध करून दिल्यास कोरोना आपत्ती संपेपर्यंत ते बंद करण्यात येईल.
  • आरोग्यसेवा आणि अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कार्यालये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या क्षमतेने चालवावी. वर्क फ्रॉम होमवर भर द्यावा. आदेशाचा भंग करणारी कार्यालये कोरोना साथ आटोक्यात येईपर्यंत बंद केली जातील.
  • धार्मिकस्थळांच्या व्यवस्थापनाने दरताशी येणाऱ्या भाविकांचे प्रमाण जागेची उपलब्धता पाहून मर्यादित करावे.
  • धार्मिकस्थळे, मॉल्स, थिएटर्स, हॉटेल या ठिकाणी मास्क असल्याशिवाय आणि तापमान तपासल्याशिवाय कुणालाही प्रवेश देऊ नये.
  • राज्यातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल, सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्स) ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार. मास्कशिवाय कुणालाही प्रवेश नाही. ठिकठिकाणी हँड सॅनिटायझर् ठेवणे बंधनकारक. नियमांचे उल्लंघन करणारे सिनेमागृहे किंवा हॉटेल्स रेस्टॉरंट कोरोना जाईपर्यंत बंद करण्यात येतील. हे नियम शॉपिंग मॉल्सनाही अनिवार्य.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा