घातक ओमीक्रॉन विषाणू आधीपासूनच भारतात?, आयसीएमआरचे तज्ज्ञ डॉ. पांडा यांचे मोठे वक्तव्य

1
110
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः संपूर्ण जगावर दहशतीचे सावट निर्माण करणारा ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची लागण भारतातही झालेली असण्याची शक्यता आहे. आयसीएमआरचे साथरोगासंदर्भातील विभाग प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी याबाबत मोठे विधान केलेले आहे. कदाचित ओमीक्रॉनची लागण भारतात आधीच झालेली असू शकते. त्याचा शोध घ्यायला कदाचित वेळ लागेल, असे डॉ. पांडा यांनी म्हटले आहे.

ओमीक्रॉन हा विषाणू सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत सापडला होता. ९ नोव्हेंबरला ओमीक्रॉनच्या पहिल्या रूग्णाची नोंद झाली. तेव्हापासून दक्षिण आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात प्रवास झाला आहे. काही प्रवाशांमध्ये लक्षणेही आढळून आलेली आहेत. भारतात आधीच ओमीक्रॉन आलेला असण्याची शक्यता आहे. त्याचा शोध लागण्यास कदाचित वेळ लागेल, असे डॉ. पांडा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

भारतात ओमीक्रॉन आढळल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. या विषाणूची संक्रमण क्षमता पाहता काही दिवसात हे होण्याची शक्यता आहे. भारतात कोरोनाचे संकट पुन्हा निर्माण झाले तर देश पूर्णपणे तयार असल्याचेही डॉ. पांडा म्हणाले.

लसीकरणामुळे संसर्ग होत नाही, असे नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. एखाद्याने लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी संसर्ग होऊ शकतो. कोरोनायोग्य वर्तन न पाळल्यास एखाद्याला नेहमीच संसर्ग होऊ शकतो. मास्क, हातांची स्वच्छता आणि मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळणे हे संसर्ग रोखण्यास मदत करू शकतात, असेही पांडा म्हणाले.

केवळ लस कोरोनाच्या नव्या विषाणूशी लढण्यास मदत करू शकत नाही. लसीमुळे इतर आजार, रूग्णालयात जाण्याची वेळ, मृत्यू या गोष्टी टळू शकतात. मात्र संसर्ग रोखता येत नाही. लोकांचे आरोग्य ही सर्वोच्च प्राथमिकता असून जास्तीत जास्त लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजे यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. बूस्टर डोससाठी जे पात्र आहेत, त्यांना तो दिला पाहिजे. मात्र हे करताना लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही डॉ. पांडा म्हणाले.

एक प्रतिक्रिया

  1. किती फालतू राजकारण चालू आहे आपल्या देशात.
    हा आजार, ती महामारी, तो virus,
    च्या मायला, डॉक्टर, आणि वैज्ञानिक पागल झाले साले.
    नियत बिघडली डॉक्टर्स ची.
    खुले आम लूट करायला तयार आहेत डॉक्टर लोक.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा