राष्ट्रवादी काँग्रेसचा जनता दरबार दोन आठवडे स्थगीत

0
120
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्यात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात येणारा जनता दरबार हा उपक्रम दोन आठवड्यांसाठी स्थगीत करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी ही माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबार या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री उपस्थित राहतात आणि जनतेच्या समस्या ऐकून घेतात. मात्र सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा उपक्रम पुढील दोन आठवडे स्थगीत करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे आणि मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन आणि गर्दी टाळावी, अशी सूचनाही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

 जनता दरबार स्थगितीच्या काळात काही समस्या किंवा प्रश्न असतील तर त्याबाबतचे संपूर्ण निवेदन संबंधित मंत्र्यांच्या नावे ncpjantadarbar@gmail.com या ईमेलवर पाठवता येईल. हे निवेदन संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असेही गर्जे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा