औरंगाबादेत आज १ हजार ३९ नवे रुग्ण, १ हजार ६५१ जण कोरोनामुक्त; २८ रुग्णांचा मृत्यू

0
152
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्गाचा जोर आज थोडा ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यात आज १ हजार ३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्या महापालिका हद्दीतील ४९७ आणि ग्रामीण भागातील ५४२ रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे आज १ हजार ६५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर २८ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज उपचारानंतर सुटी देण्यात आलेल्या १ हजार ६५१ रुग्णांत महापालिका हद्तील ७१८ आणि ग्रामीण भागातील ९३३ रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ४ हजार २३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर  आतापर्यंत जिल्ह्यात  २ हजार ४०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १२ हजार ९७५ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १९ हजार ६०८ वर पोहोचली आहे.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीत ४९७ रुग्ण आढळले. त्यात औरंगाबाद १५, सिडको एन-१ येथे १४, बीड बायपास १७, सातारा परिसर १६, शिवाजी नगर १०, केंब्रिज स्कूल ७, गारखेडा ६, घाटी ४, दर्गा १, पाणचक्की १, चंद्रशेखर नगर १, छत्रपती नगर १, हरिसाई पार्क ३, जाधवमंडी २, खडी रोड देवळाई २, कासलीवाल मार्वल १, ईटखेडा २, मधुबन सोसायटी १, बन्सीलाल नगर ४, अंगुरीबाग १, शीतल नगर ३, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप २, मयुरबन कॉलनी १, म्हाडा कॉलनी २, चाणक्यपुरी शहानूरवाडी २, नागेश्वरवाडी ४, पद्मपुरा २, सिडको एन-३ येथे १, नंदनवन कॉलनी ४, सूतगिरणी चौक १, संजय नगर १, पडेगाव ८, एमआयडीसी  चिकलठाणा १, मामा चौक १.

चिनार गार्डन १, न्यू विशाल नगर २, छावणी ५, पैठण रोड १, नारेगाव ३, सिडको ७, प्रगती नगर १, चुनाभट्टी २, संजय नगर बायजीपुरा १, भीमनगर भावसिंगपूरा ३, उल्का नगरी ५, सिडको एन-४ येथे ५, आयुक्त कार्यालय २, मुकुंदवाडी ३, दत्तनगर २, एमजीएम हॉस्पीटल १, सिडको एन-५ येथे १, चिकलठाणा ६, हनुमान नगर २, साईनगर सिडको २, विश्वभारती कॉलनी १, आकाशवाणी १, भूषण नगर १, जवाहर कॉलनी २, आदिनाथ नगर १, अनंत नगर १, आभूषण पार्क १, व्हिजन सिटी पैठण रोड १, सनशाईन हॉस्पीटल जवळ १, कांचनवाडी १, नक्षत्रवाडी २, न्यू हनुमान नगर ३, एन-४ येथे २, एन-२ येथे ६, गणेश नगर १, विश्रांती नगर २, प्रकाश नगर १, हर्सूल ५, अंबिका नगर १.

संजय नगर मुकुंदवाडी १, जय भवानी नगर २, देवळाई चौक २, म्हाडा कॉलनी मुर्तिजापूर १, कासलीवाल पूर्वा चिकलठाणा १, देवानगरी १, काबरा नगर १, पोलीस कॉलनी मिलकॉर्नर १, लक्ष्मी कॉलनी १, किलेअर्क १, एन-१२ येथे १, मिलकॉर्नर २, एन-९ येथे ४, मयुर पार्क ४, गुंजन अपार्टमेंट ज्युब्ली पार्क जवळ १, जाधववाडी ४, भगतसिंग नगर १,  नवजीवन कॉलनी १, म्हसोबा मंदिराजवळ १, म्हसोबा नगर १, सारा परिवर्तन १, श्रीकृष्ण नगर १, दिशा सिल्वर वुड १, सिडको एन-७ येथे ५, सिडको एन-८ येथे ६, सिडको एन-६ येथे २,  हडको १, शनी मंदिर २.

देवानगरी २, बेगमपुरा २, समृध्दी कर्मचारी १, महेश नगर २, कासलीवाल तारांगण मिटमिटा १, हायकोर्ट कॉलनी १, देवडा नगर १, आदित्य नगर १, सहकार नगर १, राजाबाजार १, एमआयडीसी नारेगाव रोड १, सिविल हॉस्पीटल १, पाणचक्की १, राज पेट्रोल पंप १,  एस.बी.कॉलनी १, बालाजी नगर १, न्यू उस्मानपुरा १, अजब नगर ४, समर्थ नगर ४, गादिया विहार ३, श्रीनिकेतन कॉलनी २, ऑरेंज सिटी १, पुंडलिक नगर १, विद्यापीठ १, खोकडपूरा १, मिलिट्री हॉस्पीटल ४, अन्य १७२  रुग्ण आहेत. 

ग्रामीण भागात आज ५४२ रुग्ण आढळले आहेत. त्यात  बजाज नगर ११, वाळूज २, सिडको महानगर १ येथे २, तिसगाव १, रांजणगाव १, वडगाव कोल्हाटी २, घारदोन १, चैसगाव १, कन्नड १, हिरापूर १, गेवराई तांडा १, झाल्टा फाटा १, चितेगाव १, नांदेडा ता.गंगापूर १, लाडसावंगी २, पिसादेवी ४, चितेपिंपळगाव १, गारज ता.वैजापूर १, गलवाडा ता.सोयगाव १, बाळापूर १, फुलंब्री २, कसाबखेडा फाटा १, लासूर स्टेशन १, अखिलेश नगर गंगापूर २, दौलताबाद १, वाळूज हॉस्पीटल ७, शरणापूर १, वळदगाव १, पोखरी १, घारदोन तांडा १, अन्य ४८७ रुग्ण आहेत.

२८ रुग्णांचा मृत्यूः औरंगाबाद जिल्ह्यात आज २८ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. आज झालेल्या मृत्यूपैकी घाटी रुग्णालयात २० रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात ३ आणि खासगी रुग्णालयात ५ रुग्णांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत १६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर १२ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा