औरंगाबादकरांना दिलासाः नवे रुग्ण, मृत्यू संख्याही घटली!

0
188
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात १ हजार ६१ रुग्ण आढळले. तर २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. औरंगाबादकरांनी संयम पाळला आणि कोरोना नियमावलीचे पालन केले तर ही संख्या अजून कमी होऊ शकते, असा अंदाज आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख २२ हजार ९४१ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या २ हजार ४८४ वर पोहोचली आहे. वेळीच चाचणी आणि उपचार घेतला तर कोरोनावर मात करता येते, हे अनेक रुग्णांनी अनुभवलेले आहे.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीत ४५६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात घाटी परिसर १, भावसिंगपुरा १,पडेगाव १,उस्मानपुरा १,साई नगर १,बीड बायपास ५,सातारा परिसर ५, देवळाली २,लक्ष्मी कॉलनी १,शितल नगर १,दर्शन विहार १, सोनिया नगर ३, हर्सुल ११, सिडको एन-१ ३, सिडको एन-६ येथे ४,  सिडको एन-७ येथे ६,  सिडको एन-८ येथे ५, सिडको एन-९ येथे ३, सिडको एन-११ येथे ८, सिडको एन-१२ येथे ३,  सिडको एन-५ येथे २,  सिडको एन-४ येथे १, मयुर पार्क ८,जाधववाडी ७, सारावैभव जटवडा रोड १,पुडंलिक नगर २,न्यू हनुमान नगर २, आनंद नगर ३, अदित्य नगर २, गुलमोहर कॉलनी २, बालाजी नगर १, अल्का सोसायटी १,अलंकार सोसायटी १,गारखेडा ५.

भानुदास नगर १, देशमुख नगर १, रेणुका नगर ३, सिंधी कॉलनी १,विशाल नगर ४, जय विश्वभारती कॉलनी १, आलमगीर कॉलनी १, अल्तमश कॉलनी बायजीपुरा  १, म्होसाबा नगर ४, साई मेडिसिटी हॉस्पीटल १, छत्रपती नगर १, एस.आर.पी.एफ. कॅम्प ३, कॅम्ब्रीज शाळेजवळ अभिजित हॉटेल १, देवानगरी १, जय मल्हार नगर ३, कासलीवाल गार्डन मुंकदवाडी २, मुंकदवाडी रेल्वे स्टेशन ३, राजीव गांधी नगर ३, विमानतळ जवळ १, न्यू गणेश नगर १, ब्लयू बेल हाऊसिंग सोसायटी एम.आय.डी.सी. १,कासलीवाल पूर्व १, जय भवाणी नगर १, पियूष विहार अयोध्या नगर १, मनाली रेसीडेंन्सी सिडको १, राज नगर गादिया विहार १, दर्गा परिसर १, सुधाकर नगर १,आकाशवाणी १.

देवळाई परिसर १,संजय नगर १,शिवाजी नगर ३, संग्राम नगर जवळ रेणुका माता परिसर २, हाय कोर्ट कॉलनी १, केशव नगर २, गजानन नगर २, मयुर बन कॉलनी १, जय भवाणी नगर ६,श्रेय नगर १,देवानगरी १,शंभु नगर १, उल्का नगर ४, विश्व भारती कॉलनी १, शिवशंकर कॉलनी १,मिसारवाडी १,बुढ्ढीलाइन १, मिल कॉर्नर १, मोहनलाल नगर १, न्यु कुतुबपुरा १, टि.व्ही सेंटर १, टाऊन हॉल १, संघर्ष नगर १, देशमुख नगर १, करोल १, म्हाडा कॉलनी २, विठ्ठल नगर २, देवगिरी कॉलनी १, विश्रांती नगर २, उत्तार नगरी १, राम नगर १, दुध डेअरी १, नायक नगर १,खडकेश्वर १, अन्य २५६ रुग्ण आहेत.    

 ग्रामीण भागात आज ६०५ रुग्ण आढळले. त्यात चिकलठाणा ६,वैजापूर २,उपळी १,निमगाव१, फुलंब्री१, जामखेड १,पिसादेवी २, मस्नतपुर १, कन्नड १,सिल्लोड १, आपतगाव २, लाडगाव शेंद्रा एम.आय.डी.सी. २, शिरेगाव लासूर स्टेशन १,अंधारी १, माळीवाड ३, साई मंदीर बजाज नगर १०, साजापुर १, गणेश नगर रामगिरी रोड वाळूंज २,वडगाव २,सिडको महानगर ३,फुलशिवरा गंगापुर १, नक्षत्रवाडी ३, कांचनवाडी १, झाल्टा १, पैठन १,  अन्य ५०४ रुग्ण आहेत.

२० कोरोनाबाधितांचा मृत्यूः आज दिवसभरात २० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी १६ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयात दोन मृत्यू झाले. आज मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी १० मृत्यू ग्रामीण भागातील तर १० मृत्यू शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा