नांदेड जिल्ह्यात आज १ हजार २९१ व्यक्ती कोरोनाबाधित, १० जणांचा मृत्यू

0
55

नांदेडः जिल्ह्यात आज, सोमवारी प्राप्त झालेल्या ५ हजार ६१ अहवालापैकी १ हजार २९१ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ७७१ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५२० अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३३ हजार ७ एवढी झाली आहे.

आजच्या ५ हजार ६१ अहवालापैकी ३ हजार ३९० अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ३३ हजार ७ एवढी झाली असून यातील २५ हजार ८५५ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ६ हजार २६४ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ५९ बाधितांची प्रकृती अतिगंभीर स्वरुपाची आहे.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी १९, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ३०५, कंधार तालुक्यांतर्गत ३, माहूर तालुक्यांतर्गत १९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड १६, हदगाव १, मुखेड ५, खाजगी रुग्णालय ३२ असे एकूण ३९२ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.३३ टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ५६६, भोकर तालुक्यात ११, देगलूर १२, हदगाव २, कंधार १, लोहा ३६, नायगाव ९, परभणी ४, हिंगोली १, नांदेड ग्रामीण २१, बिलोली ५, धर्माबाद १७, हिमायतनगर १४, किनवट २३, मुखेड ३३, उमरी १३, यवतमाळ १, आदिलाबाद २ असे एकूण ७७१ बाधित आढळले.

आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३४१, भोकर तालुक्यात ११, धर्माबाद ७, कंधार ७, लोहा ३३, मुदखेड ३७, नायगाव ६, परभणी २, हिंगोली १, नांदेड ग्रामीण १५, देगलूर ३०, हदगाव ३, किनवट ६, माहूर १६, मुखेड २, लातूर २, आदिलाबाद १ असे एकूण ५२० बाधित आढळले. जिल्ह्यात ६ हजार २६४ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील ५४ वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील ५३ वर्षाचा पुरुष, अंबानगर येथील ७० वर्षाची एक महिला, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे राजनगर नांदेड येथील ६४ वर्षाचा पुरुष, नांदेड येथील ७० वर्षाचा पुरुष, भाग्यनगर येथील ४७ वर्षाची माहिला, खाजगी रुग्णालयात सोमेश कॉलनी येथील ९० वर्षाचा पुरुष, शिवाजीनगर येथील ५० वर्षाचा पुरुष, चैतन्यनगर येथील ६८ वर्षाचा पुरुष आणि नांदेड येथील ८० वर्षाच्या एका महिलेचा समावेश आहे. हे मृत्यू दिनांक २० ते २२ मार्च २०२१ या कालावधीत झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या ६५८ एवढी झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा