धोका वाढलाः औरंगाबादेत आज दिवसभरात आढळले १ हजार ३३५ नवे रुग्ण, १७ रुग्णांचा मृत्यू

0
307
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत चालला असून आज, बुधवारी दिवसभरात तब्बल १ हजार ३३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर तब्बल १७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या ही दोन्ही आकडेवारी आजपर्यंत उच्चांकी आकडेवारी आहे. त्यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झपाट्याने फैलावत चालला आहे. सध्या जिल्ह्यात ७ हजार ५५२ सक्रीय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या तब्बल ६१ हजार ४३५ झाली असून आजपर्यंत १ हजार ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज महापालिका हद्दीतील ३५७ आणि ग्रामीण भागातील ८५ अशा ४४२ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे.

आज औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत ९६२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात सिडको एन-१२ मध्ये २१, उस्मानपुरा १६,  सिडको एन-५ मध्ये  १२,  हनुमान नगर १०, चिकलठाणा ८, जय भवानी नगर ७, सातारा परिसर १५, सिडको  एन-२ मध्ये १०, गारखेडा १६, शिवाजी नगर १३, बीड बायपास १६, उल्कानगरी ९, सिडको एन-४ मध्ये ७, एन-७ मध्ये  ७, पानदरीबा ४, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह १, आयोध्या नगर १, बंजारा कॉलनी १, देवगड औरंगाबाद १, टी.व्ही.सेंटर ३, न्यू विशाल नगर ३, म्हाडा कॉलनी २, , एमजीएम होस्टेल २, एन-१ ६, एन-६ मध्ये १, इंदिरा नगर २, मयुर पार्क २, विजय नगर १, लेबर कॉलनी १, मुकुंदवाडी ११, संजयनगर २, जाधववाडी १, राजनगर ५, रोकडिया हनुमान कॉलनी २, प्रभानगर १, सारा सिटी पैठण रोड १, देवानगरी १, टिळक नगर १, कैलास नगर १, सुराणा नगर १,  सेवन हिल १, आकाशवाणी २, एन-९ ४, हर्सूल १, पुंडलिक नगर ७,  हडको कॉर्नर १, पहाडसिंगपुरा १.

हेही वाचाः चिंता वाढलीः राज्यात आज तब्बल २३ हजार १७९ कोरोनाबाधित रुग्ण ८४ जणांचा मृत्यू

 सिध्दी पार्क सारा वैभव १, आंबेडकर नगर १, विश्रांती नगर २, जय भवानी नगर ३, राजीव गांधी नगर १, विठ्ठल नगर १, उत्तरा नगरी २, शहानूरवाडी २, अंबिका नगर १, नंदीग्राम सोसायटी १, पार्वती नगर १, सुतगिरणी चौक ४, न्यु कॉलनी १, ठाकरे कॉलनी १, छत्रपती नगर १, गजानन नगर ४, टाऊन सेंटर १, ब्रिजवाडी १, मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, विद्याधन कॉलेज १, देवळाई ३, अशोक नगर १, एन-३ १,राजा बाजार ३, सराफा बाजार २, श्रेय नगर ५, छावणी ४,  ज्योतीनगर ६, औरंगाबाद २, बालाजी नगर ३, बेगमपूरा १, पडेगाव ४, पेठेनगर १, पद्मपूरा ९, नवाबपूरा १, गरमपाणी १, गुलमंडी १, बिसमिल्ला कॉलनी १, रेल्वे स्टेशन ५, एम्स हॉस्पीटल २, वेदांत नगर ३, सिडको १, दर्गा रोड १, चिश्तिया कॉलनी १, एकनाथ नगर १, शहानूरवाडी १, ईटखेडा पैठण रोड ३, सारा गार्डन आशीर्वाद रो हाऊसेस १, स्वामी विवेकानंद नगर २, जानीपूरा १, सिंधी कॉलनी ३, रामनगर १, खाराकुंआ १, नागेश्वरवाडी ३, मिटमिटा १, खोकडपूरा १, सन्मित्र कॉलनी १, गजानन कॉलनी १, आदित्यनगर ३,गुरू रामदास नगर १, भीमनगर भावसिंगपुरा २, समर्थ नगर २, चेलीपूरा ५, न्यू नंदनवन कॉलनी २, मारोती  नगर १.

 चिंतामणी कॉलनी १, एसबीआय ३, दशमेश नगर २, पैठण गेट १, अमृतसाई प्लाझा १, बन्सीलाल नगर ५, कांचनवाडी ४, एमआयडीसी कॉलनी ३,  पोतदार इंटरनॅशनल स्कुल १, कासलीवाल मार्वल १, एस.बी.कॉलनी १, अमृतसाई सारा सिटी १, उस्मानपूरा म्हाडा कॉलनी ४, गाढे नगर १, रामानंद कॉलनी २, क्रांती नगर १, म्हसोब नगर हर्सूल २, सुदर्शन नगर हडको १, मयुरपार्क २, भगतसिंगनगर १, आरोग्यम हॉस्पीटल १, राजे संभाजी कॉलनी हर्सूल १, होनाजी नगर हर्सूल २, एन-११ मध्ये १, निसर्ग कॉलनी भावसिंगपूरा १, आदित्य नगर हर्सूल १, पॉवर लूम एमआयडीसी चिकलठाणा १, कटकट गेट शरीफ कॉलनी २, भवानी नगर जुना मोंढा १, लेबर कॉलनी १, सौदामिनी हाऊसिंग सोसायटी १, स्वरुप कॉलनी सिडको १, संकल्प नगर हडको १, मेहेर नगर २, शिवशंकर कॉलनी १, मित्र नगर १, औरंगपुरा १, विजय चौक १, प्रताप नगर १, भानुदास नगर १, बनबट नगर १, गिरीजा देवी हौसिंग सोसायटी १.

 बाळापूर नगर १, देशमुख नगर १, दिशा संकुल शिवाजी चौक ६, मातोश्री  नगर १, गुरूसहानी नगर १, साईनगर २, वसंत विहार २, आदर्श कॉलनी १, सिडको  एन-८ मध्ये २, आईसाहेब नगर हर्सूल १, आनंद नगर १,  श्रेयस नगर १, केंब्रिज चौक २, नक्षत्रवाडी ४, समता नगर १, साईकृष्ण अपार्टमेंट पैठण रोड १, राहुल नगर २, पन्नालाल नगर २, दिशा संस्कृती पैठण रोड १, रचनाकार कॉलनी १, विद्यापीठ परिसर १, राजू नगर १, अजब नगर १, परिजात नगर २, रामनंद कॉलनी १, श्रीकृष्ण नगर दर्गा १, गौतम नगर १, जवाहर कॉलनी १, शाकार नगर १, एमजीएम स्पोर्टस् बिल्डिंग १, उद्योग शेंद्रा बीबीपी १, एमजीएम स्टाफ १, अन्य ४८० रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज ३७३ रुग्ण आढळले. त्यात बजाजनगर २३, सिडको महानगर ११, रांजणगाव शेणपुंजी १, बिडकीन १, शेंद्रा २, पिसादेवी २, जैतपूर १, हिरापूर साईनगर १, जोगेश्वरी वाळूज २, रांजणगाव ४, खुल्ताबाद १, हसनाबाद कन्नड १, पिशोर कन्नड २, पैठण ३, जयहिंद नगरी पिसादेवी २, सावंगी हर्सूल १, पाटोदा १, कमलापूर वाळूज १, वडगाव ५,  सलामपुरे वडगाव ४, एमआयडीसी वाळूज २, गंगापूर २, गांधेली १, आडगाव बुद्रुक १, रवींद्र नगर १, अन्य २९७ रुग्णांचा समावेश आहे.

१७ रुग्णांचा मृत्यूः आज १७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात घाटी रुग्णालयात १० रुग्णांचा तर खासगी रूग्णालयात ७ रुग्णांचा मृत्यू झाला. नुकतेच केंद्रीय पथक औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेले होते. घाटी रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे जनुकीय संरचनेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याची सूचना केंद्रीय पथकाच्या अहवालावरून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून केली होती. औरंगाबादेतून मृत रूग्णांचे जनुकीय संरचनेचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येतात की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा