ब्रेक झाली चेनः औरंगाबाद शहरात आज आढळले फक्त १४३ कोरोना रुग्ण,ग्रामीणमध्ये अजूनही चिंता

0
106
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण आढळून येऊ लागल्यामुळे भयभीय झालेल्या औरंगाबाद शहरात ब्रेक दि चेनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होऊ लागल्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. आज, शुक्रवारी औरंगाबाद शहरात केवळ १४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. औरंगाबादकरांसाठी ही दिलासादायक बातमी असतानाच ग्रामीण भागात आजही ३१९ नवे रुग्ण आढळले आणि १६ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामीण भागात अजूनही खबरदारी घेण्याची गरज आहे.

शुक्रवारी दिवसभरात औरंगाबाद शहरातील ११६ आणि ग्रामीण भागातील ४५९ अशा एकूण ५७५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३० हाजर ४५३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३९ हजार ६०५ वर पोहोचली आहे. आज २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा ३ हजार २८ वर पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात ६ हजार १२४ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद शहरात आढळलेल्या १४३ रुग्णांमध्ये सिडको ६, हर्सूल ४, घाटी परिसर ३, राधास्वामी कॉलनी १, नारळीबाग १, नंदनवन कॉलनी १, पैठण गेट १, म्हाडा कॉलनी ४, जालान नगर २, उस्मानपुरा २, वेदांतनगर १, गादीया विहार १, रेल्वे स्टेशन १, गारखेडा ३, जोतीनगर १, बालाजी नगर १, गजानन नगर २, पडेगाव १, मयूर पार्क ५, जयभवानी नगर २, मेहर नगर १, मुकुंदवाडी ६, एन-१ येथे २, रामनगर २, विठ्ठल नगर १, उल्कानगरी १, हनुमान नगर ३, गजानन कॉलनी १, विजयनगर २, गजानन मंदिर १, भावसिंगपुरा १, हुसेन कॉलनी १, सातारापरिसर ३, बीड बायपास २, चंद्रशेखर नगर १, साई नगर १, नवजीवन कॉलनी १, शिवाजी नगर१, पोलीस कॉलनी १, हडको २, अयोध्या नगर २, पीसादेवी रोड १, जाधववाडी २, होनाजी नगर १, कटकट गेट १, चिकलठाणा एमआयडीसी १, शहानूरवाडी ३, अरिहंत नगर १, अन्य ५४  रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात ३१९ नवे रुग्ण आढळले. त्यात बजाजनगर ५, वडगाव कोल्हाटी  ४, नारेगाव ३,  पैठण २, करोडी १, सुंदरवाडी १, कचनेर १, कन्नड १, देवगाव २, इटखेडा १,कांचनवाडी ३, सिल्लोड १, फुलंब्री १, विहामांडवा १, वाळूज महानगर २, साजापूर १, अन्य २८९ रुग्ण आहेत.

२३ रुग्णांचा मृत्यूः शुक्रवारी जिल्ह्यातील २३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १४ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयात ५ तर खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत १६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत तर ७ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा