औरंगाबादचा आजचा कोरोना स्कोअर १,४९३ रुग्ण, २४ मृत्यू, ग्रामीण भागात सुसाट रुग्णवाढ

0
62
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद:  औरंगाबादेतील कोरोना संसर्गाची स्थिती अद्यापही सुधारण्याच्या मार्गावर दिसत नाही. आज जिल्ह्यात १ हजार ४९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या रुग्णांतही ग्रामीण भागातील सर्वाधिक म्हणजे ९६७ रुग्ण आहेत. तर औरंगाबाद महापालिका हद्दीतील ५२३ रुग्ण आहेत. आजवर शहरी भागापुरताच मर्यादित असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात झपाट्याने पसरू लागल्याचे गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवरून दिसू लागले आहे.

दरम्यान आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ९०० आणि ग्रामीण भागातील ६७८ अशा एकूण १ हजार ५७८ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण ९२ हजार ६८३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत २ हजार १८० रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण १५ हजार ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ४९३ झली आहे.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीत आढळलेल्या ५२६ रुग्णांमध्ये सिडको ४, पडेगाव २, बुध्द नगर १, हर्सूल ५, अन्य १०, ज्योती  नगर १, गारखेडा परिसर २, मिसारवाडी १, रेल्वे स्टेशन १, कांचनवाडी ६, नागेश्वरवाडी १, मीरा नगर १, एन-६ सिडको ८, जाधववाडी १, मिलकॉर्नर २, राजाबाजार ३, श्रीनिकेतन कॉलनी १, भवानी नगर मोढा १, मनीषा कॉलनी २, जालान नगर १,  पदमपुरा १, समर्थ  नगर २,  बेगमपुरा १, मुडणे पसोली १,  म्हाडा कॉलनी १,  गांधी नगर १,  औरंगपुरा १,  नाथ नगर २,  त्रिमूर्ती चौक १, मुकुंदवाडी १,    पैठणरोड परिसर १,    देवळाई चौक ७,  गजानन नगर ६, भानुदास नगर १, भारत नगर १,  शिवनेरी कॉलनी १,  विश्वभारती कॉलनी २, बीडबाय पास ८, शिवाजी नगर २,  पुंडलिक नगर १,  सिंधी कॉलनी १, झांबड इस्टेट १, उल्का नगरी १,  नवनाथ नगर ३.

रमेश नगर १,  जयभवानी नगर ४,  विजय नगर १,  स्वप्न नगरी १, एन-११ हडको ५, एन-४ सिडको ५,  रहनूमिया कॉलनी १, मयूर पार्क ३,  एन-१२ १, सूर्यावाडी १,एन-२ सिडको २, सातारा परिसर ७,   ठाकरे नगर ४,  एसटी कॉलनी १, म्हाडा कॉलनी ३, उत्तरानगरी १, श्रध्दा कॉलनी ३, मुकुंद नगर १,  धूत हॉस्पीटल परिसर १,  हनुमान नगर १,  अंबिंका नगर १, विश्रांती नगर १, संजय नगर १, देवा नगरी ३, तुळाई नगर ३, सुधाकरनगर १, पेशवेनगर १.

विनोस सिटी १, चाणक्य नगर १, शिल्प नगर १,  महू नगर १, रेणुका नगर १, नंदनवन कॉलनी १, भावसिंगपुरा १, एन-९ एन-२ सिडको १, भाग्य नगर १,  होनाजी नगर २, सारा वैभव ३, जाधववाडी १, एन-१३ २, टिळक नगर १,  आदित्य नगर १, ऑडीटर सोसायटी १, संगवी १,  एन-५ सिडको २,एन-७ २,   एन-८ ६,  चिकलठाणा १, व्यकटेश कॉलनी १,शाह नगर १, सृष्टी हॉस्पिटल १, मिल कॉर्नर व्दारकापुरी १, नंदनवन कॉलनी १, अन्य ३२५  रुग्ण आहेत.       

ग्रामीण भागात आज ९६७ रुग्ण आढळले. त्यात  रांजणगाव २, बजाजनगर २, पैठण १, लाडगाव १,वेरुळ १, एएस क्लब , वाळूज २,   सिडको महानगर१, पंढरपूर १,निलजगाव १, वैजापूर१, अन्य ९५४ रुग्ण आहेत.             

२४ कोरोनाबाधितांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील २४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १९ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात ४ आणि खासगी रुग्णालयात २ रुग्णांचे मृत्यू झाले. आज मृत्यू झालेल्या रुग्णांत १२ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तर १२ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा