रुग्णसंख्येचा आलेख खाली घसरलाः औरंगाबादेत आज १५७ नवे रुग्ण, ७ मृत्यू

0
97
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने खाली येत आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १५७ नवे कोरोनाबाधित रुग्ण रुग्ण आढळून आले. त्यात औरंगाबाद शहरातील ६७ आणि ग्रामीण भागातील ९० रुग्ण आहेत. दरम्यान गेल्या २४ तासांत जिल्ह्यांत ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे औरंगाबाद शहरातील १३६ आणि ग्रामीण भागातील २७२ असे ४०८ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत १ लाख ३६ हजार ४६३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १लाख ४२ हजार ८८९ वर गेली आहेत तर आतापर्यंत एकूण ३ हजार २१४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार २१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत आज ६७ रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर २, बीड बायपास २, गारखेडा १, शिवाजी नगर २, कांचनवाडी २, अजब नगर १, मिटमिटा १, पेठे नगर १, एन-१२ येथे १, एन-५ येथे २, हर्सूल ३, संत ज्ञानेश्वर नगर १, आंबेडकर नगर १, चेतना नगर २, सारा वैभव १, सुरेवाडी १, विश्रांती नगर १, संभाजी कॉलनी १, एन-४ येथे १, पुंडलिक नगर १, इंदिरा नगर १, माऊली नगर १, सातारा पोलीस स्टेशन मागे १, जवाहर कॉलनी १, निसर्ग कॉलनी भीमनगर २, तथागत चौक बन्सीलाल नगर २, द्वारका नगर पडेगाव १, गुलमंडी १, संजय नगर २, मेल्ट्रॉन एमआयडीसी २, अन्य २५  रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात ९० रुग्ण आढळून आले. त्यात वाळूज एमआयडीसी १, नावडी ता.कन्नड १, रांजणगाव १, भराडी ता.सिल्लोड २, फुलंब्री १, लासूर स्टेशन ता.गंगापूर १, हट्टी ता.सिल्लोड १, अन्य ८२ रुग्ण आहेत.

सात रुग्णांचा मृत्यूः गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी ५ मृत्यू घाटीत झाले तर २ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. मृतांपैकी ४ रुग्ण ग्रामीण भागातील तर ३ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा