औरंगाबाद शहरात आज ८६, ग्रामीण भागात १३० नवे रुग्ण; ११ रुग्णांचा मृत्यू

0
57
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबादेतील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. आज दिवसभरात औरंगाबाद जिल्ह्यात एकूण २१६ नवीन रुग्ण आढळले. त्यात औरंगाबाद शहरातील ८६ आणि ग्रामीण भागातील १३० रुग्णांचा समावेश आहे. दुसरीकडे आज जिल्ह्यात ११ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यातील ४७० जणांनी कोरोनावर मात केली. त्यात औरंगाबाद शहरातील १४३ आणि ग्रामीण भागातील ३२७ रुग्ण आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ३६ हजार ५५ रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतपर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार ७३२ वर पोहोचली असून आतापर्यंत कोरोनाने  ३ हजार २०७ रुणांचा बळी घेतला आहे.

औरंगाबाद शहरात आज ८६ रूग्ण आढळले. त्यात  अंबर हिल १, पुंडलिक नगर १, ज्योती नगर १, सिडको एन-५ येथे १, देवळाई म्हाडा कॉलनी १, जालन नगर १, नवयुग कॉलनी  २, पडेगाव पोलीस कॉलनी १, भीमनगर भावसिंगपुरा २, दक्षिण विहार कांचनवाडी १, हायकोर्ट कॉलनी  २, शहा नगर ३, सातारा परिसर १, देवळाई रेाड बीड बाय पास १, बीड बाय पास २, पैठण रोड १, जिजामाता नगर १, अन्य ६३ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात १३० रुग्ण आढळले. त्यात  समता नगर ता.सिल्लोड १, वाळूज महानगर १, अन्य १२८ रुग्ण आहेत.

११ रुग्णांचा मृत्यूः जिल्ह्यातील ११ कोरोनाबाधित रुग्णांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी ८ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले तर ३ मृत्यू जिल्हा सामान्य रुग्णालयात झाले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी ८ मृत्यू हे ग्रामीण भागातील आहेत तर ३ मृत्यू औरंगाबाद शहरातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा