औरंगाबाद शहरात आज फक्त ७१ नवीन रुग्ण, ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही घटली!

0
106
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली असून जिल्ह्यात आज २२८ नवीन कोरोना रुग्ण आढळले. त्यापैकी औरंगाबाद शहरातील ७१ तर ग्रामीण भागात १५७ रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत २३ रुग्णांचा मृत्यू झाला.

दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातील ५३० जणांना सुटी देण्यात आली. त्यात औरंगाबाद शहरातील २०० तर ग्रामीण भागातील ३३० रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार २७८ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण १ लाख ३५ हजार ५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजवर ४ हजार ५४ जणांचा कोरोनाने बळी घेतला.

औरंगाबाद शहरात आज ७१ नवीन रुग्ण आढळले. नंदनवन कॉलनी  १, घाटी परिसर १, जवाहर नगर १, देवानगरी १, सिकडो एन-१३ येथे १, सिडको एन-७ येथे १, एन-१२ येथे १, गारखेडा २, कुशल नगर १, अजब नगर १, सातारा परिसर १, तारांगण सोसायटी १, वानखेडे नगर १, एन-९ येथे १, जय भवानी नगर ३, मुंकदनगर १, राज नगर मुंकदवाडी १, सिडको एन-१ येथे १, सारा वैभव हर्सूल १, चिकलठाणा एमआयडीसी १, म्हाडा कॉलनी १, हनुमान नगर १, अलोक नगर १, सेव्हन हिल २, चौधरी कॉलनी चिकलठाणा १, श्रीविनायक कॉलनी १, अन्य ४१ अन्य रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात आज १५७ रुग्ण आढळले. अंधारी ता. सिल्लोड १, तलवाडा १, जटवाडा १, सासुरवाडा ता.सिल्लोड  २, बजाज नगर २, टाकळी ता.सिल्लोड  १, शिंदोन  १, वाळूज  १,लक्ष्मी नगर ता.पैठन १, ता.पैठन १, ता.कन्नड  १, भराडी ता.सिल्लोड १, अन्य १४३ रुग्ण आहेत.

२३ जणांचा मृत्यूः गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील २३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १५ रुग्णांचा मृत्यू घाटी रुग्णालयात झाला. जिल्हा सामान्य रुग्णालयात २ तर खासगी रुग्णालयात ६ रुग्णांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूमध्ये १६ मृत्यू ग्रामीण भागातील आहेत तर ७ रुग्ण शहरी भागातील आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा