चिंता वाढलीः राज्यात आज तब्बल २३ हजार १७९ कोरोनाबाधित रुग्ण ८४ जणांचा मृत्यू

0
64

मुंबईः राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली असून आज बुधवारी दिवसभरात २३ हजार १७९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

 राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती चिंताजनक होत चालली असताना राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अनेक शहरात अंशतः संचारबंदी तर काही शहरात पूर्णतः लॉकडाऊन केलेला असला तरी कोरोना संसर्गाचा फैलाव थांबण्याचे नाव घेत नाही. आज दिवसभरात २३ हजार १७९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण रूग्ण आढळून आले आहेत. तर ८४ जणांचा मृत्यू झाला आहे.

 राज्यात आज ९ हजार १३८ रुग्णांना सुटी देण्यात आली. आतापर्यंत २१ लाख ६३ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख ५२ हजार ७६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२६ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ५३ हजार ८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा