राज्यात आज ५८ हजार ९५२ नवे कोरोनाबाधित रुग्ण, २७८ मृत्यू

0
36
प्रातनिधिक छायाचित्र

मुंबईः कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात आज बुधवारपासून पंधरा दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाच आज दिवसभरात राज्यात तब्बल ५८ हजार ९५२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच राज्यात आजपर्यंत आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या  ३५ लाख ७८ हजार १६० झाली आहे. सध्या राज्यात ६ लाख १२ हजार सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

 राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मृतांचा आकडाही खाली येताना दिसत नाही. आज राज्यात तब्बल २७८ कोरोनाबाधित रुग्ण दगावले आहेत. दुसरीकडे आज राज्यात दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

 राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ८१.२१ टक्के आहे. तर मृत्यूदर १.६४ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत ५८ हजार ८०४  कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत्यू झालेल्या २७८ रुग्णांपैकी ५४ मृत्यू हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. कोरोनाने एकट्या मुंबईत आजपर्यंत १२ हजार १४७ रुग्णांचा बळी घेतला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा