औरंगाबादेत आढळले ९४४ नवे रुग्ण, २७ रुग्णांचा मृत्यू

0
37
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ९४४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरात आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही नियंत्रणात आणण्याचे सामूहिक प्रयत्न होण्याची गरज आहे.

दरम्यान, बुधवारी जिल्ह्यातील १२६५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यात औरंगाबाद शहरातील ७३२ आणि ग्रामीण भागातील ५३३ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८०० जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १ लाख २८ हजार ९०२ झाली आहे. आतापर्यंत कोरोनाने २ हजार ६५८ जणांचा बळी घेतला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ४४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद महापालिका हद्दीत बुधवारी दिवसभरात ३८१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात चिकलठाणा १०, बीड बायपास ७, सिडको एन-५ येथे ७, हर्सूल ६, सिडको एन-६ येथे ६, शिवाजी नगर ४, गारखेडा ५, होनाजी नगर ४, मुंकदवाडी ५, घाटी परिसर १, श्रध्दा कॉलनी १, औरंगाबार परिसर २, सिडको १,  सिडको एन-८ येथे २, सिडको एन-४ येथे १, सिडको एन-१ येथे ३, सिडको एन-९ येथे ४, सिडको एन-७ येथे २, सिडको एन-१२ येथे २, सिडको एन-२ येथे २,  सिडको एन-११ येथे ४, प्रोझान मॉल येथे १, बसय्यै नगर १, गुरूदत्त नगर १, जय हिंद नगर १, विकास नगर १, विश्रांती नगर १, जय भवानी नगर ३, समर्थ नगर १, खडकेश्वर  १, कैलास नगर १, समता नगर २, बेगमपुरा ३, पहाडसिंगपुरा २, सातारा परिसर ४, देवळाई परिसर ४, दिशा नगरी १, पैठण रोड १, एसआरपीएफ कॅम्प १, शिव नगर १, विजय नगर ३, म्हाडा कॉलनी ५, भावसिंगपुरा १, छावणी २, श्रीनिकेतन कॉलनी १, रामनगर ३, राज नगर १, विश्रांती नगर १, उल्का नगरी १, नवनाथ नगर २, लक्ष्मी चौक २, मयूर पार्क २, सहयोग नगर १, कर्णपुरा १, मिसारवाडी २, जाधववाडी १, टिळक नगर १, विजय चौक १, सौजन्य नगर १, न्याय नगर २, बालाजी नगर ४, कटकट गेट १, भानुदास नगर १, गादिया विहार ३, बजरंग नगर १, ज्योती नगर १, सेव्हन हिल १, सिंहगड कॉलनी १, चेतक घोडा श्रीराम नगर १, विश्व भारती कॉलनी १, झे.पी.क्वार्टर १, अन्य २२१ रूग्ण आहेत.

ग्रामीण भागात ५६३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात वाळूज महानगर  ११, बजाज नगर ८, सिल्लोड ७, पिसादेवी ५, सोनवाडी १,शेलगाव १, कन्नड १, पळशी १, आडगाव १, नायगाव वाळूज १, नायगाव १, ईटखेडा २, कांचनवाडी ४, गंगापूर बोरगाव ३, वर्दी पैठन १,नारेगाव १, शेवता करमाड १, शेंद्रा ४, हर्सूल सावंगी ३, पानवडोद १, धोंडवाडा १, कडेठाण पैठण १, देवळाई तांडा १, ताजनापूर १, पिशोर १, देवळाणा खुलताबाद १, बनशेंद्रा १, इटावा १, गोंदेगाव ता.सोयगाव १, जातेगाव ता.फुलंब्री १, माळीवाडा २,  दौलताबाद १, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी ३, जोगेश्वरी १, मेहदीपूर ता.गंगापूर १, अन्य ४८६ रुग्ण आहेत.

 २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूः बुधवारी जिल्ह्यातील २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २० मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. तर ७ रुग्णांचे मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. बुधवारी झालेल्या मृत्यूपैकी १७ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर १० रुग्ण औरंगाबाद शहरातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा