औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले ९४६ नवे कोरोनाबाधित, २५ रुग्णांचा मृत्यू

0
65
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू नियंत्रणात येऊ लागली आहे. आज जिल्ह्यात ९४६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तब्बल २२ मृत्यू ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ लाख २९ हजार ८४८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर आतापर्यंत २ हजार ६८३ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ५०२ आणि ग्रामीण भागातील ५४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ८५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या जिल्ह्यात ९३१४ सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद शहरात आज ३२८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात  सातारा परिसर ११, बीड बायपास १६, मयूर पार्क १०,  शिवाजी नगर ८, गारखेडा ७, सिडको एन-२ येथे ७, मिसारवाडी १, पडेगाव ७, भावसिंगपुरा ६, सिडको एन-४ येथे ५, नक्षत्रवाडी ७, सिडको एन-५ येथे ४, सिडको एन-६ येथे ६, भोईवाडा २, केशव नगरी १, दलालवाडी १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी २, उल्का नगरी २, समता नगर १, व्यंकटेश कॉलनी १, एन-१ येथे ४, एस.टी. कॉलनी १, सिडको एन-७ येथे १, अंबिका नगर १, राम नगर ३, विश्रांती नगर १, जय भवानी नगर ४, चिकलठाणा २, न्यू हनुमान नगर १, हर्सूल २, जाधववाडी २, न्यायनगर २, कांचन नगर २, शहानूरमियॉ दर्गा २, अलोक नगर २, एसआरपीएफ कॅम्प १, लक्ष्मी कॉलनी २, सूर्यादीप नगर १, लक्ष्मी नगर २, नाईक नगर १, आशा नगर १, पुंडलिक नगर ४, चेतन घोडा १, देवळाई रोड १, हाऊसिंग सोसायटी १, अशोक नगर १, जवाहर कॉलनी २, टी.व्ही.सेंटर २, राधास्वामी कॉलनी २, पहाडसिंगपुरा २, लेबर कॉलनी १, आंबेडकर नगर १, सिडको एन-८ येथे ३, सेवन हिल १, चेतना नगर १, बसैये नगर २,  मिलकॉर्नर २, एन-१० येथे १, बायजीपूरा १, एन-९ येथे २, चौधरी कॉलनी १, गजानन नगर २, दिवाणदेवडी १, अजब नगर १, श्रेय नगर १, राहुल नगर १, देवळाई परिसर ६, अबरार कॉलनी १, पेठे नगर २, विष्णू नगर २, ज्युब्ली पार्क २, विमानतळ २, उस्मानपुरा २, पद्मावती कॉलनी स्टेशन रोड १, एकनाथ नगर १, बनेवाडी १, सिंधी कॉलनी १, न्यू लक्ष्मी कॉलनी १, ज्योती नगर १, बन्सीलाल नगर २, प्रताप नगर १, शहानूरवाडी २, न्यू एसबीएच कॉलनी २, नंदनवन कॉलनी २, एमजीएम पीजी हॉस्टेल १, मिलिट्री हॉस्पीटल १, न्यू बालाजी नगर १, कांचनवाडी ३, अरिहंत नगर १, शिल्प नगर १, क्रांती चौक १, मनजीत नगर १, वेदांत नगर १, जटवाडा रोड १, अमृतसाई प्लाझा १, भाग्योदय सोसायटी १, एमआयटी कॉलेज १, सिविल हॉस्पीटल १, भुजबळ नगर १, घाटी २, एमजीएम हॉस्पीटल १, एन-११ येथे १, भगतसिंग नगर १, अन्य ९२ रुग्ण आहेत.

 ग्रामीण भागात आज ६१८ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यात बजाज नगर १७, सिडको वाळूज महानगर-१ येथे ७, वडगाव कोल्हाटी १, जोगेश्वरी १, सिल्लोड २, रांजणगाव ४, पिसादेवी ५, दौलताबाद २, आडूळ ता.पैठण २, पाचोड १, सालेगाव ता.कन्नड १, खांडेवाडी १, वाळूज ४, बाळापूर १, भराडी ता.सिल्लोड १, जडगाव करमाड १, जरंडी ता. सोयगाव १, फुलंब्री १, डुबखेडा बिडकीन १, करमाड १, वैजापूर १, धुपखेडा २, गिरनार तांडा १, शेंद्रा १, शहापूर ता.गंगापूर २, अन्य ५५६ रुग्ण आहेत.

२५ रुग्णांचा मृत्यूः जिल्ह्यातील २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी १४ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. आज झालेल्या मृत्यूपैकी २२ मृत्यू हे ग्रामीण भागातील रुग्णांचे आहेत तर ३ मृत्यू औरंगाबाद शहरातील रुग्णांचे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा