औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले ९८१ रुग्ण, ४३ जणांचा मृत्यू

0
51
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात आज, मंगळवारी दिवसभरात ९८१ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ९ हजार ७९२ सक्रीय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ८४१ आणि ग्रामीण भागातील ६०५ असे १ हजार ४४६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १५५३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ लाख २७ हजार ९५८ वर पोहोचला आहे तर आतापर्यंत २ हजार ६३१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

महापालिका हद्दीत मंगळवारी ३७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात, सातारा परिसर २०, कांचनवाडी ७, अलोक नगर ५, बीड बायपास ५, गारखेडा परिसर ६, सिडको एन-९ येथे ९,  सिडको एन-७ येथे ५,  सिडको एन-८ येथे ५, औरंगाबाद ४, शिवाजी नगर ३, स्नेह नगर १, शांतीपुरा २, एलएनटी कॅम्प १, देवळाई २, पुंडलिक नगर ४, मुकुंदवाडी २, मिलकॉर्नर ३, समर्थ नगर १, केळीबाजार १, भोईवाडा १, म्हाडा कॉलनी १, किराणा चावडी १, राज नगर १, शहानूरवाडी १, केशव नगरी १, सुधाकर नगर १, काल्डा कॉर्नर १, एकनाथ नगर १,  एन-६ येथे २, आंबेडकर नगर १, जटवाडा रोड २, जाधववाडी २, होनाजी नगर २, हर्सूल ४, एन-५ येथे ५,  चिकलठाणा २, जयभवानी नगर ४.

एमजीएम कॉलेज समोर १, सूरेवाडी १, हर्सूल मध्यवर्ती कारागृह १, मयूर पार्क ३, अंबर हिल ३, पवन नगर २, गाडगे महाराज आश्रम १, नंदनवन कॉलनी ४, बेगमपूरा २, न्यू नंदनवन कॉलनी १, बालाजी नगर ३, पहाडसिंगपुरा १, रोजाबाग १, जयसिंगपुरा १, लेबर कॉलनी १, सिडको एन-२ येथे ३, चिकलठाणा एमआयडीसी ३, समृध्दी नगर १, प्रकाश नगर २, विश्रांती नगर ३,  सिडको एन-१ येथे ३, लघुवेतन कॉलनी १, गणेश नगर १, जयविश्वभारती कॉलनी १, घाटी ३, मातोश्री नगर १, हनुमान नगर १, रेणुका नगर १, सूतगिरणी १, व्यंकटेश कॉलनी १, देवळाई चौक १, त्रिमूर्ती चौक १, विद्यानगर १, नंदिग्राम कॉलनी १,  ज्ञानेश्वर नगर १, सिडको एन-३ येथे १, भावसिंगपुरा १.

शिवशंकर कॉलनी १, किलेअर्क कोविड केअर सेंटर १, एन-१० येथे २, मिसारवाडी १, एमजीएम स्टाफ १, नारेगाव १, उल्कानगरी १, सहारा नगर १, सुधाकर नगर २, गुलमंडी १, बनेवाडी १, काल्डा कॉर्नर १, पद्मपुरा २, पडेगाव ५, एन-११ येथे १, कांचननगर २, कोवल हॉस्पीटल १, बायजीपूरा १, अल्तमश कॉलनी २, विशाल नगर १, पीडब्लूडी क्वार्टर उस्मानपुरा १.

भीम नगर १, पुष्पनगरी १, काश्मीर नगर १, गजानन नगर १, रामानंद कॉलनी क्रांती चौक १, तापडिया नगर दर्गा रोड १, स्काय सिटी १, सीआयएसफ एअरपोर्ट १, आकाशवणी २, दर्गा रोड १, संजय नगर १, समता नगर क्रांती चौक १, पेठे नगर १, राज नगर क्रांती चौक १, छत्रपती नगर १, सहकार नगर ३, क्रांती चौक १, गजानन मंदिर १, भगीरथ नगर २, देशमुख नगर १, जालान नगर १, रामनगर १, मेडिअम रेसिडेन्ट १, प्रताप नगर १, मोतीवाला नगर १, अन्य १३४ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत जास्त म्हणजे ६०७ रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर १०, सिडको महानगर-१ येथे २, वडगाव १, सिडको वाळूज २, वाळूज एमआयडीसी १, रांजणगाव १, जेहूर ता.कन्नड १, लाडसावंगी १, तांदूळवाडी १, पिसादेवी ६, सावंगी २, उपळा ता.कन्नड २, पळशी १, खुलताबाद १, वाहेगाव १, धामणगाव ता.खुलताबाद १, उंडनगाव ता.सिल्लोड २, फुलंब्री १, शेवता १, गदाना ता.खुल्ताबाद १, ईटकोनी ता.पैठण १, भारत नगर घाणेगाव १, माळीवाडा १, मालेगाव ता.कन्नड १, सिल्लोड २, अंजिठा ता.सिल्लोड १, वरूड १, पुरणगाव ता.वैजापूर १, वाकडी कुकणा १, सराई ता.खुल्ताबाद १, पीरबावडा १, वैजापूर १, पिंप्री राजा १, शास्त्री नगर १, खांडेवाडी २, अन्य ५५१ रुग्ण आहेत.

४३ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील ४३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी २७ मृत्यू घाटी रुग्णालयात झाले. मिनी घाटी म्हणजेच जिल्हा सामान्य रुग्णालयात ५ आणि खासगी रुग्णालयात ११ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये २६ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर १७ रुग्ण शहरी भागातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा