औरंगाबादेत आज ९८८ नवे रुग्ण, २६ मृत्यू; नियम मोडणाऱ्यांविरुद्ध आता कठोर कारवाईचा बडगा

0
132
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात आज ९८८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून  आले आहेत तर २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९ हजार १० सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असून कोरोना नियमावलीचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा, असे आदेश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी आज दिले आहेत.

आज औरंगाबाद महापालिका हद्दीतील ४९५ आणि ग्रामीण भागातील ७७१ अशा १ हजार २६६ रुग्णांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख १९ हजार ११७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३० हजार ८३६ वर पोहोचली असून आतापर्यंत २ हजार ७०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद शहरात आज ३५२ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात घाटी परिसर २, औरंगाबाद परिसर ३, सराफा बाजार रेल्वे स्टेशन कॅम्प १, कसलीवाल पूर्वा चिकलठाणा १, चिकलठाणा ४, परिजात नगर १, म्हाडा कॉलनी ४, मुकंदवाडी ६, जय भवानी नगर २, गारखेडा ५, बंजारा कॉलनी १, गजानन नगर २, शिवाजी नगर २, जय भारत कॉलनी १, अशोक नगर १, बौध्द नगर १, एमआयटी हॉस्पिटल १, विश्वभारती कॉलनी १, विष्णू नगर २, देवळाई चौक १, देवळाई परिसर १, हनुमान नगर २, बीड बायपास रोड ६, उल्का नगरी २, गुरुदत्त नगर २, गजानन नगर १, शहानूरवाडी १, सहयोग नगर १, स्वराज नगर १, लक्ष्मी नगर १, नाथग्रम कॉलनी  १, विशाल नगर १, अलोक नगर १, पुडंलिक नगर ३, भारत नगर १, पानदरीबा रोड १, जयसिंगपुरा १, नारळीबाग २, मयूर पार्क २.

नंदनवन कॉलनी १, हर्सूल १, हनुमान नगर १, पॉवर हाऊस १, नाथ नगर १, लक्ष्मी कॉलनी २, शितल नगर १, जाधवमंडी १, सातारा परिसर ४, शिवनगर २, सहकार नगर २,  दर्गा रोड १, सुराणा नगर २, कासलीवाल मार्बल २, आनंद नगर ३, भीम नगर भावसिंगपुरा १, पेठे नगर २, एम्स हॉस्पिटल १,  राज हाईट्स १, त्रिमूर्ती चौक १, हनुमान नगर २, जिजामाता नगर १, उस्मानपुरा १, सिडको एन-१२ येथे  १, सिडको एन-२ येथे ३, सिडको एन-५ येथे १, सिडको एन-६ येथे ४, सिडको एन-११ येथे २, सिडको एन-९ येथे १, सिडको एन-८ येथे ४, सिडको एन-७ येथे ३, सिडको एन-३ येथे १, अन्य २२४ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात ६३६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर १०,वडगाव कोल्हाटी २, रांजनगाव १, बकवाल नगर वाळूज १, पिसादेवी ३, टाकळी वैद्य १, राणवारा १, शिंगेड तांडा १, वंजारवाडी ता.खुलताबाद ३, एएस क्लब १, वडवडी ता.पैठण १, वाळूज एमआयडीसी १, पडेगाव ३, कांचनवाडी ९, घाटनांद्रा ता.सिल्लोड १, हर्सूल सावंगी २, आडगाव सरक १, नायगाव २, पळशी १, देवळाई तांडा ३, खांडेवाडी ता. पैठण २, पैठण १, झाल्टा १, अब्दीमंडी ता.खुलताबाद १, पोळ रांजणगाव १, अंबेलोहाळ १, नासोडा पो.कासोडा ता.गंगापूर १, बोकुड जळगाव ता.पैठण १, अन्य ५७९ रुग्ण आहेत.

२६ रुग्णांचा मृत्यूः जिल्ह्यातील २६ कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. त्यापैकी १५ मृत्यू घाटीत झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात २ तर ९ रुग्णांचे मृत्यू खासगी रुग्णालयात झाले आहेत. आज मृत्यू झालेल्या रूग्णांपैकी १२ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर १४ रुग्ण शहरी भागातील आहेत.

नियम न पाळल्यास कठोर कारवाईः जिल्ह्यातील कोरेाना रुग्णांची संख्या हळुहळु नियंत्रणात येत आहे. परंतु काही दिवसांपासून जिल्ह्यात ब्रेक दि चेनच्या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. यापुढेही ब्रेक दि चेनच्या नियमांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नियमांचे तंतोतंत पालन होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी औषधांच्या दुकानांवर आईसक्रीम, चॉकलेट्स तसचे इतर साहित्य विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.  शहरात नागरिक अनेक ठिकाणी विनामास्क आणि विनाकारण फिरताना निदर्शनास येत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करा. आरटीओने पेट्रोल पंपावर पथक तैनात करुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करावी, राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील मद्य विक्रेते नियमांचे पालन करत आहेत का हे गांभीर्यांने पहावे, अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे चव्हाण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा