औरंगाबाद शहरात आज आढळले फक्त ९९ नवे कोरोना रुग्ण, ग्रामीण भागातील संख्याही २१९ वर

0
99
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोना संसर्गाची साखळी तुटताना दिसू लागली आहे. दिलासादायक बाब म्हणजे औरंगाबाद शहरात आज दिवसभरात फक्त ९९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात २१९ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांतील ही सर्वात कमी आकडेवारी आहे. आज जिल्ह्यात ३१८ नवे रुग्ण आढळून आले तर १७ रुग्णांची मृत्यू झाला आहे.

दरम्यान आज शहरातील २०० आणि ग्रामीण भागातील २४२ अशा ४४२ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत १ लाख ३३ हजार ४५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४१ हजार ४५१ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३ हजार १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ८७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आज शहरात ९९ रुग्ण आढळले. त्यात सातारा परिसर ३, बीड बायपास १, जय भवानी नगर ३, पुष्पनगरी १, कांचनवाडी १, सिल्क मिल कॉलनी १, घाटी २, जुने शहर १, एन-११ येथे ३, मयुरबन कॉलनी १, बन्सीलाल नगर १, भावसिंगपुरा ३, मुकुंदवाडी १, राजनगर ३, एन-६ येथे १, सिडको एन-२ येथे २, न्यू एस. टी.कॉलनी १, रामकृष्ण नगर १, रामनगर २, चिकलठाणा १, नारेगाव १, सिडको एन-८ येथे १, सिडको एन-७ येथे १, म्हाडा कॉलनी १, दिशा विनायक परिसर १, दिशा नगरी १, देवळाई रोड १, शहानूरवाडी २, चेतक घोडा १, ज्योती नगर १, न्यू पहाडसिंगपुरा १, मयूर पार्क १, टी.व्ही.सेंटर २, पडेगाव ५, एन-१ येथे २, घृष्णेश्वर कॉलनी २, जाधववाडी १, हडको १,  ईएसआयसी हॉस्पीटल १, मिटमिटा १, संजय नगर १, रेणूकुल भगवती कॉलनी १, एसबीएच कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, आंबेडकर नगर १, देवळाई परिसर १, नाथ प्रांगण गारखेडा १, समर्थ नगर ३, पद्मपुरा १, ईटखेडा १, एमआयडीसी कॉलनी रेल्वेस्टेशन १, मिलिट्री हॉस्पीटल १, एन-५ येथे १, अन्य  २३ रुग्ण आहेत.

ग्रामीण भागात २१९ रुग्ण आढळले. त्यात बजाज नगर ३, वडगाव कोल्हाटी १, गौर पिंप्री ता.कन्नड १, साऊथ सिटी १, पवन नगर रांजणगाव १, सिडको वाळूज महानगर-१ येथे २, गुडम तांडा १, विश्वबन सोसायटी हिरापूर ३, पिसादेवी ३, कासोद ता.सिल्लोड १, बिडकीन ता.पैठण १, खंडाळा ता.सिल्लोड १, एफडीसी सोसायटी १, न्यू जोगेश्वरी ता.गंगापूर १, गोर पिंपरी १, आडगाव बुद्रुक १, लक्ष्मी नगर वाळूज १, पैठण १, लाडसावंगी १, अन्य १९३ रुग्ण आहेत.

१७ रुग्णांचा मृत्यूः आज जिल्ह्यातील १७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यापैकी १२ मृत्यू घाटीत झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात १ आणि खासगी रुग्णालयात ४ रुग्णांचे मृत्यू झाले. आज झालेल्या मृत्यूपैकी ९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत तर ८ रुग्ण शहरातील आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा