BigBreakingNews: कोरोनाचे संकट गंभीरः राज्यातील ११ जिल्ह्यांत नाही एकही बेड उपलब्ध!

0
99

मुंबईः राज्यातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून राज्यातील ११ ते १२ जिल्ह्यांत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी एकही बेड शिल्लक नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना टास्क फोर्सची आज, रविवारी महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही धक्कादायक माहिती दिली.

४ एप्रिल ते १० एप्रिल असे एका आठवड्यात ४ लाख नवीन रुग्ण राज्यात आढळले. तर १९८२ मृत्यू झाले.  सध्या मृत्यू दर ०.५ टक्के इतका असून तो वाढतो आहे. गेल्या महिन्यात १४ मार्च ते २० मार्च या आठवड्यात १.५ लाख रुग्ण होते. सध्या पॉझिटिव्हिटी दर २६ टक्के असून जितक्या जास्त चाचण्या करतो आहोत तितका हा दर वाढतो आहे, असे डॉ. व्यास म्हणाले.

 काल, शनिवारी रोजी आपण २ लाख ६० हजार चाचण्या केल्या. यात १ लाख अॅन्टीजेन चाचण्या होत्या. सध्या २० हजार २५० आयसीयू बेड्स पैकी ७५ टक्के भरले असून ६७ हजार ऑक्सीजन बेड्स पैकी ४० टक्के भरले आहेत. जवळपास ११ ते १२ जिल्ह्यात बेड्स उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. नंदूरबार येथे रेल्वेला विनंती करून रेल्वे बोगीत आयसोलेशन बेड्स व्यवस्था केली आहे, अशी माहिती डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा