नाथ षष्ठीनिमित्त वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेशबंदी

0
42
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा एप्रिल महिन्यात होणाऱ्या   नाथ षष्ठीनिमित्त पायी दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले आहे.

पैठण येथे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाथ षष्ठी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून पायी दिंड्या जवळपास एक महिना अगोदर पैठणकडे येण्यास निघत असतात. पण सद्यस्थितीत सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोविडच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असल्याने नाथ षष्ठीनिमित्त वारकऱ्यांच्या पायी दिंड्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले. नाथ षष्ठीनिमित्त होणारी विधिवत पूजा पारंपरिक पद्धतीने होणार असल्याचे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा