आता आठ आठवड्यांनंतरही घेता येणार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस, एनटीएजीआयने घटवले अंतर

0
71
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः  जगातील अनेक देशांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत चालली असतानाच कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसनंतरचा दुसरा डोस आता ८ आठवड्यांनंतरही घेता येऊ शकतो. लसीकरणासंबंधी तांत्रिक सल्लागार समूहाने म्हणजेच एनटीएजीआयने कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे.

कोविशिल्डचा दुसरा डोस ८ ते १६ आठवड्यांदरम्यान देण्यात यावा, अशी शिफारस एनटीएजीआयकडून करण्यात आली आहे. आता हे अंतर १२ ते १६ आठवड्यांचे आहे. एनटीएजीआयची ही शिफारस अद्याप कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमात अंतर्भूत करण्यात आलेली नाही. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनच्या दुसऱ्या डोसमधील अंतरात मात्र कोणताही बदल सूचवण्यात आला नाही. कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस २८ दिवसांनंतर दिला जातो.

हेही वाचाः ‘बामु’च्या कुलसचिव डॉ. सूर्यंवशी म्हणतात: त्यांचे जातप्रमाणपत्र ‘शोभेची वस्तू’, पण हा वाचा पर्दाफाश

प्रोग्रामेटिक डेटामधून प्राप्त झालेल्या ताज्या जागतिक वैज्ञानिक तथ्यांच्या आधारावर एनटीएजीआयने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या तथ्यांमध्ये आढळलेल्या माहितीनुसार कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस आठ आठवड्यांनंतर दिला गेल्यावर शरीरात निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजची संख्या ही १२ ते १६ आठवड्याच्या अंतराने दिल्या गेलेल्या दुसऱ्या डोस इतकीच असते.

हेही वाचाः डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या ‘गुणवत्तेच्या आधारे’ निवड झाल्याच्या दाव्यातही खोटच, ही वाचा वस्तुस्थिती…

जगातील अनेक देशांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याच्या निर्णयामुळे उर्वरित सहा ते सात कोटी लोकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्याच्या प्रक्रियेला गती येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या आधी केंद्र सरकारने एनटीएजीआयच्या शिफारशीनुसार १३ मे २०२१ रोजी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवले होते. देशात लसीकरणामुळे प्रतिबंधित करता येणाऱ्य आजारांवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण सेवेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला एनटीएजीआय सल्ला देते आणि मार्गदर्शन करते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा