मुंबईः पुण्यामध्ये आज आणखी एक कोरोना बाधित रूग्ण आढळून आला असून त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ वर गेली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. काल मंगळवारी मुंबईत एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला.
पुण्यात आज आढळून आलेला कोरोना बाधित रूग्ण महिला असून ही महिला फ्रान्सहून भारतात आली आहे. पदेशातून आल्यामुळे तिची चाचणी करण्यात आली होती. ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तिच्यावर पुण्यातील नायडू रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना बाधित हा नवा रूग्ण सापडल्यामुळे पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या ८ वर पोहोचली आहे. राज्यात आजपर्यंत पिपंरी-चिंचवडमध्ये १०, मुंबईत ७, नागपूरात ४ आणि नवी मुंबई, यवतमाळ, कल्याण येथे प्रत्येकी ३ रूग्ण आढळून आले आहेत. औरंगाबाद, रायगड, ठाणे, अहमदनगर येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला आहे.