कोरोना उपचारासाठी सरकार नियुक्त डॉक्टरच ५० लाखांच्या प्रधानमंत्री विमा योजनेस पात्रः हाय कोर्ट

0
87
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोनावरील उपचारासाठी सरकारने नियुक्त केलेले डॉक्टरच ५० लाख रुपयांच्या प्रधानमंत्री विमा योजनेस पात्र आहेत, असा महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. रुग्णांची सेवा करताना कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नवी मुंबईतील एका खासगी डॉक्टराच्या पत्नीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती काथावाला आणि न्या. रियाझ छगला यांनी नवी मुंबईतील डॉक्टर भास्कर सुरगडे यांच्या विधवा पत्नीने प्रधानमंत्री विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. डॉ. सुरगडे हे कोरोना उपचारासाठी सरकारने नियुक्त केलेले डॉक्टर नाहीत. त्यामुळे त्यांना या विमा योजनेचा लाभ मिळू शकत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

प्रधानमंत्री विमा योजनेसाठी सरकारकडून अधिकृत डॉक्टर म्हणून नियुक्त केले जाणे आवश्यक आहे, असे निरीक्षण नोंदवून उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

डॉ. सुरगडे हे खासगी डॉक्टर होते. लॉकडाऊन काळात त्यांनी आपला दवाखाना बंद ठेवला होता. मात्र नवी मुंबई महापालिकेने त्यांना दवाखाना सुरू करण्यासाठी नोटीस बजावली होती. दवाखाना सुरू केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा नोटिसीत देण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी दवाखाना सुरू केला. रुग्णांवर उपचार करतानाच ते स्वतः कोरोना बाधित झाले आणि त्यांचा १० जून २०२० रोजी मृत्यू झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा