कोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा खुलासा

0
468

नवी दिल्लीः कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये सुटी जाहीर केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्रक बनावट असल्याचा खुलासा पत्र सूचना कार्यालयाने केला आहे.

 देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी  केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांत १४ मार्च ते २१ मार्चपर्यंत सुटी जाहीर केल्याचे बनावट पत्रक व्हॉट्सअपवर व्हायरल झाले आहे. या पत्रकावर भारत सरकारचे अवर सचिव राजेंद्र कुमार यांची स्वाक्षरीही आहे. ही सुटी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि दहापेक्षा जास्त लोक काम करणाऱ्या कार्यालयांनाही बंधनकारक असल्याचे या बनावट पत्रकात भासवण्यात आले आहे. मात्र हे पत्रक बनावट असल्याचा खुलासा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा