Exclusive: औरंगाबादच्या ऑरिक सिटीत सुरू होणार ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प, चणचण संपणार

0
139
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे वैद्यकीय क्षेत्रात ऑक्सीजनची मोठी मागणी वाढली असून राज्य सरकारने सर्व ऑक्सीजन निर्मिती कंपन्यांना पूर्ण क्षमतेने ऑक्सीजन निर्मिती करण्याचे निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यातील शेंद्रा येथील ऑरिक सिटीमध्ये ऑक्सीजन निर्मितीसाठी आयनॉक्स एअर प्रॉडक्टस् लिमिटेड कंपनीला उत्पादन सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. यासाठी कंपनीला भूखंडाचे देण्यात आला असून लवकर या ठिकाणी उत्पादन सुरू होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

 राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून मेडिकल ऑक्सीजनची मोठी मागणी वाढली आहे.  मागणीच्या तुलनेत राज्यात ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शेजारच्या राज्यातून महाराष्ट्राला ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे नुकतीच केली आहे.

 दुसरीकडे राज्य सरकारने सर्व ऑक्सीजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना पूर्ण क्षमतेने प्रकल्प सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. एकूण उत्पादनाच्या ८० टक्के ऑक्सीजन केवळ वैद्यकीय सेवेसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश जारी केले आहेत.

राज्याची ऑक्सीजनची वाढती गरज लक्षात घेऊन राज्याच्या उद्योग विभागाने आयनॉक्स एअर प्रॉडक्ट कंपनीला ऑक्सीजन वायू निर्मितीसाठी ऑरिक सिटीमध्ये सुमारे ५.६० एकरचा भूखंड वितरित केला आहे. सुमारे १३५  कोटींची गुंतवणूक करून कंपनीत औद्योगिक  वापराच्या ऑक्सीजन वायूच्या उत्पादनासाठी ग्रीनफिल्ड प्रकल्प स्थापित करीत असून या ठिकाणी एअर सेपरेशन प्लांट ऑक्सीजन, नायट्रोजन आणि ऑर्गोनची निर्मिती केली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा