मुंबईसह २५ जिल्ह्यांतील पॉझिटिव्हिटी दरात मोठी घट, वाचा तुमच्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर

0
106
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने ओसरू लागल्याचे चित्र असून मुंबईसह राज्यातील २५ जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने जारी केलेल्या निर्बंध शिथिलतेच्या पाचस्तरीय पद्धतीच्या निकषामध्ये या आठवड्यात मुंबईसह राज्यातील तब्बल २५ जिल्हे आले आहेत. परिणामी या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांत शिथिलता मिळू शकते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध शिथिलतेसाठी काही निकष जाहीर केले असून निर्बंध हटवण्यासाठी पाचस्तरीय पद्धतीचा अवलंब केला आहे. दर आठवड्याला त्या त्या जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी दर आणि व्यापलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या या आधारावर दर आठवड्याला या पाचस्तरीय पद्धतीत समाविष्ट जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात येते.

या आठवड्यात निर्बंध शिथिलतेच्या पहिल्या स्तरात तब्बल २५ जिल्ह्यांचा समावेश झाला आहे. ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हिटी दर आणि व्यापलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या २० टक्क्यांच्या आत असलेल्या जिल्ह्यांचा निर्बंध शिथिलतच्या पहिल्या स्तरात समावेश होतो.

पहिल्या स्तरातील जिल्हे आणि त्यांचा पॉझिटिव्हिटी दरः (आकडे टक्क्यांत)

 • मुंबईः ३.७९
 • नागपूरः १.२५
 • औरंगाबादः २.९४
 • नाशिकः ४.३९
 • ठाणेः ४.६९
 • अहमदनगरः ३.०६
 • अकोलाः ४.९७
 • अमरावतीः १.९७
 • भंडाराः ०.९६
 • बुलढाणाः २.९८
 • चंद्रपूरः ०.६२
 • धुळेः २.४२
 • गडचिरोलीः ३.५३
 • गोंदियाः ०.२७
 • हिंगोलीः १.९३
 • जळगावः ०.९५
 • जालनाः १.५१
 • लातूरः २.५५
 • नांदेडः १.९४
 • नंदूरबारः ३.१३
 • परभणीः ०.९४
 • सोलापूरः ३.७३
 • वर्धाः १.१२
 • वाशिमः २.७९
 • यवतमाळः ३.७९

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा