रुग्णालयाने दिलेल्या प्रत्येक वैद्यकीय बिलांचे आता होणार सरसकट लेखापरीक्षण!

0
52
प्रातिनिधिक छायाचित्र.

पुणेः कोरोना काळात रुग्णांकडून रुग्णालयांकडून भरमसाठ बिले वसूल करण्यात आल्याच्या अनेक घटना राज्यात समोर येत असून राज्यात रूग्णांची होणारी लूट थांबवण्यासाठी रुग्णालयातून देण्यात येणाऱ्या प्रत्येक वैद्यकीय बिलाचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

यापूर्वी खासगी रुग्णालयाकडून देण्यात येणाऱ्या दीड लाखांपर्यंतच्या वैद्यकीय बिलाचे लेखा परीक्षण करण्यात येत होते. आता मात्र सरसकट सर्वच बिलांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयांमध्ये लेखापरीक्षक नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

रुग्णालयाकडून जास्त रकमेची वैद्यकीय बिले आकारण्यात येत आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे येत आहेत. त्यांचे पूर्व लेखापरीक्षण करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकात उपायुक्त, सनदी लेखापाल आणि डॉक्टरांचा समावेश आहे.

या पथकांकडून आतापर्यंत दीडलाख रुपायांपेक्षा जास्त रकमेच्या बिलांचे पूर्व लेखापरीक्षण करून त्यानुसार आतापर्यंत ८ हजार १२५ बिलांमधील सुमारे १२ कोटी ७६ लाख रुपये रक्कम कमी झाली. आता सरसकट लेखापरीक्षण केले जाणार आहे, असे टोपे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा