‘सोमवारपासून घराबाहेर पडाल तर पोलिसांशी भिडाल!’

0
1017

भंडाराः सोमवारपासून घराबाहेर फिराल तर पोलिसांना भिडाल कारण सोमवारपासून पोलिस अनावश्यक रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार आहेत. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज शनिवारी ही माहिती दिली. आता मात्र सरकारने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात माहिती देताना वडेट्टीवार म्हणाले की, नागरिकांनी घाबरून जाऊ नये म्हणून प्रारंभी सरकारने नरमाईची भूमिका घेतली. मात्र लोक ऐकत नसल्यमुळे यापुढे कठोर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही.

हेही वाचाः मोदी पश्चिम बंगाल निवडणुकीत व्यस्त, आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहूः मुख्यमंत्री

राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रस्त्यांवरची गर्दी कमी होताना दिसत नाही. राज्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सीजनची नितांत गरज आहे. याबाबात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणे झाले आहे. ऑक्सीजन पुरवठ्यासाठी लष्कराची मदत मागण्यात आली आहे. राज्यात कोरोनाची स्थिती बिकट आहे. नागरिकांना प्राणवायू हवा आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र केंद्र सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचाः महाराष्ट्र मागतोय लस, मोदी सरकार म्हणते उपलब्धतेनुसार देऊ!

गडकरी, फडणवीसांना कोविड हॉस्पीटल्स बांधली, काँग्रेस कधी बांधणार?  या प्रश्नावर वडेट्टीवार म्हणाले की, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांना हवेत कोविड हॉस्पीटल्स बांधली आहेत का? भाजप नेत्यांनी बांधलेली कोविड हॉस्पीटल्स जनतेला दिसतच नाहीत, असेही ते म्हणाले.

हेही वाचाः औरंगाबादेत आज १,६०० नवे कोरोना रुग्ण, ३२ मृत्यू; ग्रामीण भागातील स्थिती चिंताजनक

 राज्यात शनिवारी ६७ हजार नवे रूग्णः राज्यात शनिवारी दिवसभरात ६७ हजार १२३  नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ४१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३७ लाख ७०७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत ५६ हजार ७८३  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत ३० लाख ६१ हजार १७४  रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ४७ हजार ९३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा