औरंगाबादः शहरातील रूग्ण घटले, ग्रामीण भागात मात्र वाढ

0
77
प्रातनिधिक छायाचित्र

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील रूग्णसंख्या मात्र वाढताना दिसत आहे. आज औरंगाबाद शहरात केवळ ९ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले तर ग्रामीण भागात ८३ रूग्ण आढळून आले आहेत. काल शहरात १३ तर ग्रामीण भागात ३३ रूग्ण आढळून आले होते.

दुसरीकडे औरंगाबाद शहरातील ३१ आणि ग्रामीण भागातील ९३ अशा १२४ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार २२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण ९१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार ११८ झाली आहे. आजपर्यंत एकूण ३ हजार ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ६७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आज औरंगाबाद शहरात ९ रूग्ण आढळले. त्यात घाटी ३, क्रांतीनगर १, ढोपळेस टॉवर १, आझाद चौक १, मन्सूर कॉलनी १, हर्सूल १,अन्य १ रूग्णाचा समावेश आहे.

ग्रामीण भागात आज ८२ रूग्ण आढळले. त्यात  आज एकूण ३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी दोन मृत्यू घाटीत झाले आहेत. तर एका रूग्णाचा मृत्यू खासगी रूग्णालयात झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा