महाराष्ट्रः २४ तासांत १००८ नवीन रूग्ण, २६ मत्यू; एकूण कोरोना बाधितांची संख्या ११,५०६ वर

0
110

मुंबई : महाराष्ट्रात आज १,००८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले तर २६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ११,५०६ तर कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ४८५ झाली आहे. दुसरीकडे, आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात ९१४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात २६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडणारांची एकूण संख्या ४८५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी पुणे शहरातील १०, मुंबईचे ५, जळगाव जिल्ह्यातील ३ तर पुणे जिल्ह्यातील १, सिंधुदुर्गमधील १, भिवंडी महानगरपालिकेतील १, ठाणे मनपामधील १, नांदेड मधील १, औरंगाबाद मनपामधील १ तर १ मृत्यू परभणी येथील आहे. या शिवाय उत्तर  प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू मुंबई येथे झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी १८ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या २६ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १४ रुग्ण आहेत तर ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर एक जण ४० वर्षांखालील आहे. या २६ रुग्णांपैकी १५ जणांमध्ये (५८ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

मुंबईतील रूग्णसंख्या ७,८१२: महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना बाधित रूग्ण राजधानी मुंबईत आढळून आले आहेत. आतापर्यंत मुंबईत आढळलेल्या रूग्णांची संख्या ७,८२ आहे. राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूही मुंबईतच झाले असून हा आकडा २९५ इतका आहे. त्या खालोखाल पुणे महानगरपालिका क्षेत्रात १,१७६ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत ९२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे जिल्ह्यात आढळून आलेल्या एकूण रूग्णांची संख्या १,३१६ आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा