महाराष्ट्रात आज रेकॉर्डब्रेक रूग्णसंख्या, एकाच दिवशी आढळले १० हजार ५७६ कोरोना रूग्ण!

0
55
प्रतिकात्मक छायाचित्र.

मुंबई: राज्यात आज१० हजार ५७६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या३ लाख ३७ हजार ६०७ वर पोहोचली आहे.तर राज्यात आज २८० कोरोना बाधित रूग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याचा एकूण मृतांचा आकडाही १२ हजार ५५६ वर पोहोचला आहे.

  दुसरीकडे आज राज्यात ५ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत बरे होणाऱ्यांची एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले  २८० मृत्यू हे मुंबई मनपा ५८, ठाणे १६, ठाणे मनपा १३, नवी मुंबई मनपा ३,कल्याण डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा २, भिवंडी निजामपूर मनपा ३, मीरा भाईंदर ७, वसई विरार मनपा ४,पालघर १,रायगड १,पनवेल ३, नाशिक २, नाशिक मनपा ४, अहमदनगर ३, अहमदनगर मनपा ३, धुळे १,  जळगाव ८, जळगाव मनपा १, नंदूरबार १, पुणे ३, पुणे मनपा ३६, पिंपरी चिंचवड मनपा १८,सोलापूर ६, सोलापूर मनपा ६, सातारा २, कोल्हापूर ६, कोल्हापूर मनपा १०, सांगली १, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, रत्नागिरी ३, औरंगाबाद ४, औरंगाबाद मनपा २३, जालना १, हिंगोली १, परभणी २, लातूर २, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, नांदेड मनपा ३, अकोला १, अकोला मनपा २, बुलढाणा १, नागपूर मनपा ३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

आकडेवारीत महाराष्ट्र
एकूण कोरोना बाधित रुग्णः ३ लाख ३७ हजार ६०७, बरे झालेले रुग्णः १ लाख ८७ हजार ७६९, मृत्यूः १२,५५६, ॲक्टिव्ह रुग्णः १,३६,९८०

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा