औरंगाबादेत आज आढळले १०८ कोरोना बाधित रूग्ण, हर्सूल तुरूंगात पुन्हा ५ जणांना संसर्ग

0
276

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारपर्यंत तब्बल १०८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ हजार २२४ वर गेली आहे. यातील ५ रूग्ण हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील आहेत. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी १ हजार ७५३ रूग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. तर १७० रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ३०१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज आढळलेल्या रूग्णांत सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ४, शहानूरवाडी ४, मुजीब कॉलनी ५, शंभू नगर ४, चिकलठाणा ५, श्रीविहार कॉलनी, बीड बायपास ३, पुंडलिक नगर ३,  उस्मानपुरा ३,  बजाज नगर २, नागेश्वरवाडी २, हर्सूल २, लोकमान्य चौक, बजाज नगर २, शिवाजी नगर २, लहू नगर २, रामेश्वर नगर २,  बजाज नगर २, एन अकरा सिडको २, न्यू हनुमान नगर २,  एन नऊ सिडको २, जाधववाडी २, रामकृष्ण नगर २, इटखेडा २, विश्वभारती कॉलनी २, राजन नगर १, बायजीपुरा १, रहीम नगर १, युनुस कॉलनी १, हनुमान चौक चिकलठाणा १, राम नगर १, रशीदपुरा १, नारळीबाग २, क्रांती नगर १, अंबिका नगर १, नक्षत्रवाडी १, मिल कॉर्नर १,एन पाच सिडको १, एन आठ सिडको १, शिवाजी नगर १, बीड बायपास १, जय हिंद नगर, पिसादेवी १, भानुदास नगर १, जाधववाडी १, पळशी १, आरीश कॉलनी १, गौतम नगर, प्रगती कॉलनी १, द्वारका नगर, हडको १, समता नगर १, राम नगर १, ब्रिजवाडी १, न्यू ‍विशाल नगर १, मयूर नगर १, बुढीलेन १, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १,  सिडको महानगर १, साऊथ सिटी, सिडको महानगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, शिवालय चौक, बजाज नगर १, सारा गौरव, बजाज नगर १ , एसबी नगर १, अहिंसा नगर १, अंगुरी बाग १, जहाँगीर कॉलनी १, लोटा कारंजा १, खामगाव, फुलंब्री १,  झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.यात ६९ पुरूष आणि ३९ महिलांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा