औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले ११३ नवीन कोरोना रूग्ण, रूग्णसंख्या वाढीचा वेग कायम

0
64

औरंगाबाद :  औरंगाबादेतील कोरोना बाधित रूग्णसंख्या वाढीचा वेग कायम असून जिल्ह्यात आज सकाळी ११३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.  त्यामुळे एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या २ हजार ७३९ झाली आहे तर आतापर्यंत १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत आढळलेल्या रूग्णांपैकी १ हजार ४५१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १ हजार १४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  

आज आढळून आलेल्या रूग्णांत बजाज नगरमध्ये १५,  पंढरपूरच्या सलामपूरमध्ये ११, गुलमंडी ५,  जिल्हा परिषद परिसर ४, छावणी परिसर ४, राजाबाजार २,  न्यू हनुमान नगर २, बायजीपुरा१, खोकडपुरा २, बांबट नगर, बीड बायपास २, साई नगर, एन सहा २, राजमाता हाऊसिंग सोसायटी १, माया नगर, एन दोन ३,  संजय नगर, आकाशवाणी परिसर १, रशीदपुरा २,  यशोधरा कॉलनी २,  सिडको पोलिस स्टेशन परिसर १,  सिल्क मील कॉलनी १, किराडपुरा १, पीरबाजार १, शहानूरवाडी १, गजानन मंदिर परिसर, गारखेडा २, अहिल्या नगर, मुकुंदवाडी १, जहाँगीर कॉलनी, हर्सूल १, कैलास नगर १, समर्थ नगर १, गौतम नगर १, भाग्य नगर १, गजानन नगर, गल्ली नं नऊ ४, मंजुरपुरा १, मदनी चौक १, रांजणगाव १, बेगमपुरा १, रेहमानिया कॉलनी १, काली मस्जिद परिसर १, क्रांती चौक परिसर १, विश्रांती नगर १, कन्नड ५, देवगिरी नगर, सिडको वाळूज १, राम नगर १, देवगिरी कॉलनी सिडको २, वडगाव कोल्हाटी २, स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी १, नक्षत्र वाडी २, बकलवाल नगर, वाळूज १, वलदगाव १, साई समृद्धी  नगर कमलापूर २, अज्वा नगर १, फुले नगर, पंढरपूर ४, गणेश नगर, पंढरपूर १, वाळूजगाव, ता. गंगापूर १, शाहू नगर, सिल्लोड १, मुस्तफा पार्क, वैजापूर १, अन्य २ रूग्णांचा समावेश आहे.  यात ७५ पुरूष आणि ३८ स्त्री रूग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा