धोका वाढलाः औरंगाबादेत आज आढळले तब्बल १२२ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण

0
118

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल १२२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३ हजार २३८ झाली आहे. आजपर्यंत १ हजार ७८१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या १ हजार २७९ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आज आढळून आलेल्या रूग्णांत राजन नगर १, बायजीपुरा १, रहीम नगर १, युनुस कॉलनी १, हनुमान चौक चिकलठाणा १, राम नगर १, बजाज नगर ५, रशीदपुरा १, नारळीबाग २, क्रांती नगर १, अंबिका नगर १, पुंडलिक नगर ३, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, हर्सूल २, एन नऊ सिडको २, एन अकरा सिडको २, मिल कॉर्नर १,एन पाच सिडको १, एन आठ सिडको १, शिवाजी नगर १, जाधववाडी २, शंभू नगर ४,  चिकलठाणा ५, रामकृष्ण नगर २, इटखेडा २, विश्वभारती कॉलनी २, बीड बायपास १, न्यू हनुमान नगर २,  जय हिंद नगर, पिसादेवी १, भानुदास नगर १,  श्रीविहार कॉलनी, बीड बायपास ३, जाधववाडी १, पळशी १, आरीश कॉलनी १, गौतम नगर, प्रगती कॉलनी १, द्वारका नगर, हडको १, समता नगर २, शिवाजी नगर २, लहू नगर २, राम नगर १, ब्रिजवाडी १, शहानूरवाडी ४, मुजीब कॉलनी ५, रामेश्वर नगर २, न्यू ‍विशाल नगर १, मयूर नगर १, बुढीलेन १, सह्याद्री हाऊसिंग सोसायटी १,  सिडको महानगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर २, सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ४, साऊथ  सिटी, सिडको महानगर १, शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, शिवालय चौक, बजाज नगर १, सारा गौरव, बजाज नगर १, हर्सुल मध्यवर्ती कारागृह ५, एसबी नगर १, उस्मानपुरा ३, अहिंसा नगर १, अंगुरी बाग १, जहाँगीर कॉलनी १, लोटा कारंजा १, खामगाव, फुलंब्री १,  झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, पैठण गेट १, जय भवानी चौक, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी २, प्रताप नगर १,  सिल्क मिल कॉलनी १,  जागृती हनुमान मंदिर, वडगाव कोल्हाटी १, नाईक नगर, देवळाई १, बानेवाडी, क्रांती चौक १, एन एक सिडको १, एन तीन, सिडको १, हनुमान मंदिराजवळ गारखेडा परिसर १, जय भवानी नगर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये ८० पुरूष आणि ४२ स्त्री आहेत.

घाटीत सात, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यूः शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये घाटी १७ जून रोजी संध्याकाळी पाच वाजता औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालय परिसरातील ४५ वर्षीय पुरूष रुग्णाचा, १८ जून रोजी दुपारी एक वाजता शिवशंकर कॉलनीतील ६४ वर्षीय पुरूष, दुपारी २.३० वाजता हडकोतील एन अकरा, मयूर नगर येथील ३८ वर्षीय पुरूष,  संध्याकाळी ६.४५ वाजता आझाद चौक, रहीम नगर येथील ४४ वर्षीय पुरूष, १९ जून रोजी मध्यरात्री १२.५० वाजता रोशन गेट येथील ६५ वर्षीय स्त्री, पहाटे तीन वाजता रेहमानिया कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष आणि सकाळी ८.३० वाजता आकाशवाणी परिसरातील ६७ वर्षीय पुरूष असलेल्या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच शहरातील एका खासगी रुग्णालयात जुन्या मुकुंदवाडीतील विठ्ठल रुक्मिहणी मंदिराजवळील ५८ वर्षीय कोरोनाबाधित स्त्री रुग्णाचा १९ जून रोजी सकाळी १०.१५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील १३१, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण ४६, जिल्हा सामान्य रूग्णालयात ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण १७८ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा