राज्यात आज एकाच दिवसात १२ हजार ३२६ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार ७६० नवीन रूग्ण, ३०० मृत्यू

0
33

मुंबई: राज्यात आज आतापर्यंच्या सर्वाधिक संख्येने रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आज सलग चौथ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या विक्रमी आहे. आज दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ७ हजार ७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४२ हजार १५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज निदान झालेले ७ हजार ७६० नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३०० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा: ७०९ (५६), ठाणे: १४२ (६), ठाणे मनपा: २२६ (७),नवी मुंबई मनपा: २५९ (७), कल्याण डोंबिवली मनपा: १०३ (६), उल्हासनगर मनपा: ३९ (१), भिवंडी निजामपूर मनपा: १५ (१६), मीरा भाईंदर मनपा: ८९ (८), पालघर: १२३ (१), वसई-विरार मनपा: ८६ (४), रायगड: १२९ (६), पनवेल मनपा: १०६, नाशिक: ११० (४), नाशिक मनपा: ३३७ (५), मालेगाव मनपा: ८, अहमदनगर: २०७ (२), अहमदनगर मनपा: १२०, धुळे: १० (२), धुळे मनपा: २५ (१), जळगाव: २४९ (७), जळगाव मनपा: ४१ (५), नंदूरबार: १० (२), पुणे: ३२६ (१०), पुणे मनपा: १,२९६ (२९), पिंपरी चिंचवड मनपा: ५८५ (१७), सोलापूर: १६३ (३), सोलापूर मनपा: ३७ (१), सातारा: १६३ (१), कोल्हापूर: २०९ (२९), कोल्हापूर मनपा: ३४ (४), सांगली: १०९ (५), सांगली-मिरज -कुपवाड मनपा: १४६ (३), सिंधुदूर्ग: १४, रत्नागिरी: ५८, औरंगाबाद: १२४ (१), औरंगाबाद मनपा: ९७ (१०), जालना: १, हिंगोली: ३, परभणी: १८, परभणी मनपा: २४,लातूर: ७५ (१), लातूर मनपा: ४४ (५), उस्मानाबाद: ३४४ (२), बीड: ५७ , नांदेड: ४३ (२), नांदेड मनपा: ५५ (१), अकोला: ११ (२), अकोला मनपा: ५ (१), अमरावती: ३ (१), अमरावती मनपा: ६९, यवतमाळ: ५२, बुलढाणा: ८७ (१), वाशिम: ६४, नागपूर: ६२ (३), नागपूर मनपा: १७४ (१४), वर्धा: ११ (१), गोंदिया: १७, चंद्रपूर: ११, चंद्रपूर मनपा: १, गडचिरोली: १२, इतर राज्य १३.

एकूण बाधितांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६वरः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २३ लाख ५२ हजार ०४७ नमुन्यांपैकी ४ लाख ५७ हजार ९५६ नमुने पॉझिटिव्ह (१९.४७ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४४ हजार ४४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३०० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

दृष्टिक्षेपात महाराष्ट्रः

एकूण कोरोनाबाधित रुग्णः ४ लाख ५७ हजार ९५६, बरे झालेले रुग्णः २ लाख ९९ हजार ३५६, आतापर्यंतचे एकूण मृत्यूः १६ हजार १४२, सध्याचे ॲक्टिव्ह रुग्णः १ लाख ४२ हजार १५१.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा