राज्यात आज १२ हजार ६०८ नवीन कोरोना बाधित रूग्ण, ३६४ जणांचा मृत्यू

0
82

मुंबई: राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.०९ टक्के एवढे आहे. आज १२ हजार ६०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ५१ हजार ५५५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले १२ हजार ६०८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३६४ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-९७९ (४७), ठाणे- १९८ (५), ठाणे मनपा-२२३ (१९),नवी मुंबई मनपा-३९३ (१३), कल्याण डोंबिवली मनपा-२९४(४),उल्हासनगर मनपा-२६ (३), भिवंडी निजामपूर मनपा-१३ (४), मीरा भाईंदर मनपा-८८ (२), पालघर-१५० (५), वसई-विरार मनपा-१९६ (७), रायगड-३२८ (८), पनवेल मनपा-१३७ (१), नाशिक-१८५ (७), नाशिक मनपा-६८८ (११), मालेगाव मनपा-६८ (१),अहमदनगर-३८१ (१),अहमदनगर मनपा-२१० (४), धुळे-१६४ (१), धुळे मनपा-१४५ , जळगाव-४५० (६), जळगाव मनपा-१३० (६), नंदूरबार-१५, पुणे- ५२३ (३१), पुणे मनपा-११९२ (५६), पिंपरी चिंचवड मनपा-९०६ (१३), सोलापूर-३४६ (३), सोलापूर मनपा-११३ (२), सातारा-२४१ (७), कोल्हापूर-४१९ (८), कोल्हापूर मनपा-३१३ (६), सांगली-११७ (३), सांगली मिरज कुपवाड मनपा-२०६ (१६), सिंधुदूर्ग-३०, रत्नागिरी-१६२ (४), औरंगाबाद-१४५ (५),औरंगाबाद मनपा-२४७ (४), जालना-९७ (१), हिंगोली-४४ (१), परभणी-८ (१), परभणी मनपा-३३, लातूर-११७ (२), लातूर मनपा-५६ (२), उस्मानाबाद-१९१ (४), बीड-७४ (९), नांदेड-७१ (४), नांदेड मनपा-७६ (१), अकोला-४१ (१), अकोला मनपा-१३, अमरावती-६३ (१), अमरावती मनपा-९९ (१), यवतमाळ-११५, बुलढाणा-१०२ (२), वाशिम-७५(१), नागपूर-१५१ (२), नागपूर मनपा-६१५ (१६), वर्धा-२७, भंडारा-२४, गोंदिया-२१ (१), चंद्रपूर-२३ (१), चंद्रपूर मनपा-१७, गडचिरोली-१०, इतर राज्य २४.

१० लाख ३२ हजार लोक होम क्वारंटाइनः आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ३० लाख ४५ हजार ०८५ नमुन्यांपैकी ५ लाख ७२ हजार ७३४ नमुने पॉझिटिव्ह (१८.८ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ३८६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३६४ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३९ टक्के एवढा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा