औरंगाबादेत १३ वा बळी, एकूण रूग्णसंख्या ५४५; एकट्या रामनगरात आज आढळले १९ रूग्ण

0
176
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील ५० वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उपचारादरम्यान आज सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाल्याचे औषधवैद्यक शास्त्राच्या प्रमुख डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी सांगितले. त्यामुळे औरंगाबादेतील मृतांची संख्या १३ झाली आहे. आज शहराच्या विविध भागात नवीन ३७ कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या ५४५ झाली आहे.

या रूग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथून ३ मे रोजी सकाळी चार वाजता पुढील उपचारासाठी घाटीत त्यांना संदर्भित केले होते. या रूग्णास मधुमेह, किडनीचा आजारही होता. मूत्रपिंडाचे काम कमी झाल्याने त्यांचे चार वेळा डायलिसिस करण्यात आले होते. त्यांना श्वासोश्वासास त्रास होत असल्याने सहा मे रोजी रात्री आठ वाजता कृत्रिम श्वासोश्वास देण्यासाठी व्हेंटिलेटर लावले. मागील दोन दिवसांपासून रक्तदाब कमी झाल्याने व न्युमोनिआ व मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी कळवले आहे.   

आज आढळले ३७ नवे रूग्णः औरंगाबाद शहरातील विविध भागातील ३७ रुग्णांची आज नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडबाधितांची संख्या ५४५ झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये २२ पुरूष, १५ महिला रुग्णांचा समावेश आहे. नव्याने आढळून आलेल्या रूग्णात राम नगरमध्ये १९, सिल्क मिल कॉलनीत ०८ , रोहिदास नगरमध्ये २ , वसुंधरा कॉलनी, एन-७, सिडकोमध्ये १, चंपा चौकमध्ये ५, दत्त नगरमध्ये१ , संजय नगरमध्ये १  या परिसरातील रूग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर आजच्या ५० वर्षीय कोविडबाधित पुरूष रुग्णांसह १३ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा