औरंगबादेत आज १३२ नवीन रूग्ण, ३ रूग्णालयांसह आरोग्य उपसंचालक कार्यालयातही लागण

0
91

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १३२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ४०७ झाली आहे. यापैकी १३१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर १२१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या ९६९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. हेडगेवार रूग्णालय, एमजीएम रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरातही आज कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

औरंगाबादेत आज आढळलेल्या रूग्णांत जयसिंगपुरा,  बेगमपुरा (१), मिसरवाडी (१), सुभेदारी विश्रामगृहाजवळ (१), उस्मानपुरा (२), एन आठ (१), जुना बाजार (१), आकाशवाणी परिसर (१), उल्कानगरी (१), संजय नगर (१), एन दोन सिडको (१), गणेश कॉलनी (१), बुढी लेन (१), बायजीपुरा (१), बंजारा कॉलनी (१), हेडगेवार रुग्णालय परिसर (१), एमजीएम रुग्णालय परिसर (१), शिवाजी नगर (५), उत्तम नगर (३), कैलास नगर (७), गादिया  विहार (१), सहकार नगर (१), नक्षत्रवाडी (१), चेलीपुरा (१), टी. व्ही. सेंटर, पोलिस कॉलनी (१), संजय नगर, बायजीपुरा (१), एन सात सिडको (१), न्यायनगर (२), हुसेन कॉलनी (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), सातारा परिसर (१), साईनगर, एन सहा (२), एन आठ सिडको, गजराज नगर (१), पांडुरंग कॉलनी, खोकडपुरा (२),  हरिप्रसाद अपार्टमेंट (१),  दशमेश नगर (१), पद्मपुरा (२), गांधी नगर (३), सिल्कमिल कॉलनी (१), विशाल नगर (३), बेगमपुरा (२),  गोविंद नगर (१), समता नगर (१), फाजलपुरा (४), न्यू हनुमान नगर (५), सिडको एन आठ (१२), गौतम नगर, घाटी परिसर (२), रशीदपुरा (१), मयूर पार्क म्हसोबा नगर (१), भवानी नगर (२), भारतमाता नगर (३), विजय नगर (१), गारखेडा, गजानन नगर (१), कोहिनूर कॉलनी (१), जिल्हा परिषद परिसर (१), हर्सूल-सावंगी (१),  जिल्हा सामान्य रूग्णालय परिसर (३), टी. व्ही. सेंटर (१), बिस्मिला कॉलनी (३), सिडको वाळूज महानगर-एक (२), एकता नगर, हर्सूल परिसर (१), बजाज नगर (७), साई नगर, पंढरपूर (३), जुनी मुकुंदवाडी (७), नारेगाव (१), गंगापूर (१), नायगाव (१), सिल्लोड (१),  आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसर (१), अन्य (१)  या भागातील कोरोनाबाधित आहेत.  यामध्ये  ७५ पुरूष आणि ५७ महिला रुग्णांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा