औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले तब्बल १३७ कोरोना बाधित रूग्ण, आजवरची सर्वात मोठी संख्या

0
78
प्रतिकात्मक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी १३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ३ हजार ४९७ झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाने १८७ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत आढळलेल्या रूग्णांपैकी १ हजार ८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या १ हजार ४५३ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

जिल्ह्यात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पळशी १०, कन्नड ६, उस्मानपुरा ७, जयसिंगपुरा ६, गजानन नगर ५, राम नगर ५, सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर ५,  शिवाजी नगर ४, एन-११ दीप नगर ४, तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, राजीव नगर ३, सातारा परिसर ३, जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी ३, जय भवानी नगर ३, एन-११, नवनाथ नगर ३, सुरेवाडी २, सिडको २, एन नऊ, न्यू विशाल नगर २, न्यू गजानन कॉलनी २, हनुमान चौक, चिकलठाणा २, जय भवानी चौक, बजाज नगर २, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर २, जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, छत्रपती नगर, वडगाव ३, पिसादेवी २, गंगापूर २ वाळूज पंढरपूर १, क्रांती नगर १, मिल कॉर्नर १,  बनेवाडी १, न्यू हनुमान नगर १, अबरार कॉलनी १, एन बारा हडको १,  बायजीपुरा १, मयूर नगर, एन अकरा १, अहिनेस नगर १, मातोश्री नगर १,  न्यू बायजीपुरा १, एन बारा, हडको १, गरिष नगर १ , नारळीबाग १,  भावसिंगपुरा १, कोकणवाडी १,  लक्ष्मी नगर १, समर्थ नगर १, राज नगर, छत्रपती नगर १, सुभाषचंद्र बोस नगर १, राजेसंभाजी कॉलनी, हर्सूल १, जाधववाडी, सिद्धेश्वर नगर १, सावित्री नगर, चिकलठाणा १, गादिया विहार, शंभू नगर १, एसटी कॉलनी, एन दोन १, चिकलठाणा, पुष्पक गार्डन १, हेडगेवार रुग्णालय परिसर १, विष्णू नगर १, एन बारा, स्वामी विवेकानंद नगर १, उल्कानगरी १, नागेश्वरवाडी १, सुदर्शन् नगर, हडको १, एन पाच सिडको १, कैसर कॉलनी १, एन दोन, ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, गारखेडा परिसर १, टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ १, एमजीएम हॉस्पीटल जवळ १, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी १, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, करमाड १, या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये ९३ पुरुष आणि ४४ महिला आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा