मुंबई: राज्यात आज कोरोनाचे २ हजार ४३६ नवीन रूग्ण आढळून आले असून १३९ कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोना बाधितांच्या संख्येने ८० हजार २२९ चा टप्पा गाठला आहे. एकीकडे रूग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढत चाललेला असताना दुसरीकडे उपचारानंतर बरे होणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यात आज १ हजार ४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १५६ झाली आहे. सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज १३९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे मृतांची एकूण संख्या २ हजार ८४९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूमध्ये मुंबईत ५४, ठाण्यात ३०, वसई विरारमध्ये १, कल्याण डोंबिवलीत ७, भिवंडीत १), जळगावमध्ये १४, नाशिकमध्ये ३, मालेगावात ८, पुण्यात १४, सोलापुरात २, रत्नागिरीत ५, औरंगाबादेत ५, जालन्यात १, परभणीत २, लातूरमध्ये १, उस्मानाबादेत १, नांदेडमध्ये १ रूग्णांचा समावेश आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ७५ पुरुष तर ६४ महिला आहेत. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी २७ मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू २१ एप्रिल ते २ जून या कालावधीतील आहेत.
५ लाख ४५ हजार लोक होम क्वारंटाइनः सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खाजगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्याचे प्रयोगशाळा चाचण्यांचे दर दशलक्ष प्रमाण ३८२७ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २८३२ इतके आहे. राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
३ हजार ४७९ क्रियाशील कंटेनमेंट झोनः राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या कंटेनमेंट ३४७९ झोन क्रियाशील असून आज एकूण १८ हजार ०२६ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६९.१८ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.