औरंगाबादेत आज आढळले १४१ कोरोना बाधित रुग्ण, दोघांचा मृत्यू

0
281

औरंगाबाद:  औरंगाबाद जिल्ह्यात आटोक्यात आलेली कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून आज जिल्ह्यात १४१ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४२ हजार ५०० वर पोहोचली असून आतापर्यंत १ हजार १३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आज महापालिका हद्दीतील ९० आणि ग्रामीण भागातील ५ कोरोना बाधितांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४० हजार ५९७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या एकूण ७६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आज महानगरपालिका हद्दीत १२५ रुग्ण आढळले. त्यात शिवाजी नगर २ कामगार चौक, चिकलठाणा २ न्यु बिगॅनीग स्कुल, सावंगी १, दशमेश नगर १, जैन इंटरनॅानल स्कूल बीड बाय पास परिसर १, एन- ३ सिडको १, छत्रपती नगर, गारखेडा १, पारिजात नगर १, जय भवानी नगर १,  एन-४ सिडको १, भास्कर वास्तु कृती, मिटमिटा २, हर्सूल सांवगी १,  सराफा रोड, परिसर १, ज्योती नगर १, सैनिक स्कूल १, जालान नगर १, उल्कानगरी १,  वेदांत नगर २,  टिळक नगर १, पोलीस कॉलनी पडेगाव १, किलबिल प्रायमरी स्कूल १, जिल्हा परिषद परिसर १, राधास्वामी कॉलनी १, भगतसिंग नगर, हर्सूल १,  हर्सूल जेल कॉटर्स १,  मयुरपार्क १, जाधवडी हर्सूल १, युगांतर सोसायटी, हडको १, पवननगर , एन-नऊ १,  अशोक नगर हर्सूल १,  एन-९ संत ज्ञानेश्वर नगर १, दिशाधारी परिसर १,  सृष्टी अपार्टमेंट १,  नाथ नगर १,  पेशवे नगर १  खोडेगाव, स्वराज विद्यालय १,  मनपा कॉर्पोरेशन स्कूल, बन्सीलाल नगर १,  एन-६ सिडको २, मीरा नगर १,  बेंगमपुरा १, बन्सीलाल नगर १, वेदांत नगर १, गारखेडा परिसर २, रेणुका माता मंदिर बीडबाय पास परिसर १, अन्य ७५ रुग्णांचा समावेश आहे.     

ग्रामीण भागात आज १६ रुग्ण आढळले. त्यात लासूर स्टेशन १, जिल्हा परिषद शाळा, तुर्काबाद १, जिल्हा परिषद शाळा, खराडी १,  शिऊर बंगला, वैजापूर १, अन्य १२ रुग्णांचा समावेश आहे.                  

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत कन्नड येथील ८० वर्षीय स्त्री, खासगी रूग्णालयात मुकुंदवाडीतील ५८ वर्षीय पुरूष  कोरोनाबाधितांचा उपचारादम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा