औरंगाबादेत कोरोनाचा १४ वा बळी, मुकुंदवाडीतील ८० वर्षीय रूग्णाचा मृत्यू

0
113

औरंगाबादः कोरोनाचा रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत चाललेल्या औरंगाबादेत कोरोनाने १४ वा बळी घेतला. रामनगर-मुकुंदवाडीतील ८० वर्षीय कोरोनाग्रस्त रूग्णांचा घाटी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोरोनाने घेतलेला हा गेल्या आठवडाभरातील पाचवा बळी आहे.

९ मे रोजी या रूग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चालल्याने १० मे रोजी त्याला व्हेंटिलेटर लावण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. औरंगाबादेत कोरोना बाधितांची संख्या ५५८ वर पोहोचली असून ४४२ जणांवर उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत ७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा