महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १ हजार १८, मृतांचा आकडा ६४ वर

0
65

मुंबई : राज्यात मंगळवारी १५० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या १०१८ वर पोहोचली आहे. राज्यात मंगळवारी १२ रूग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्याही ६४ वर पोहोचली आहे. कोरोनाबाधित ७९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या राज्यात ८७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, राज्यात मंगळवारी १२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी ६ मुंबईत, ३ पुण्यात  तर प्रत्येकी १ मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या २० हजार ८७७ नमुन्यांपैकी १९ हजार २९० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १०१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७९ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ६९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४००८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजनेअंतर्गत राज्यात  एकूण ३४९२ सर्वेक्षण पथके  काम करत असून त्यांनी १२ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

मरकझमधील २३ जण कोरोना पॉझिटिव्हः निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी २३ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशीम येथील आहेत.

कोठे किती कोरोना पॉझिटिव्ह?
मुंबईः ६४२ ( मृत्यूः ४०)
पुणेः १३०  ( मृत्यूः ०८ )
पुणे (ग्रामीण)- ०४
पिंपरी-चिंचवड मनपाः १७
सांगलीः २६
ठाणे मनपाः२१ (मृत्यूः ०३)
कल्याण-डोंबिवली मनपाः २५ (मृत्यूः ०१)
नवी मुंबई मनपाः २८ (मृत्यूः ०२)
मीरा भाईंदरः०३ (मृत्यूः ०१)
वसई विरार मनपाः १० (मृत्यूः ०२)
पनवेल मनपाः ०६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यूः ०१ ),रत्नागिरी, यवतमाळः  प्रत्येकी ०३
नागपूरः १९  (मृत्यूः ०१)
अहमदनगर मनपाः १८
अहमदनगर ग्रामीणः ०७
उस्मानाबादः ०४
लातूर मनपाः ०८
औरंगाबाद मनपाः १२ (मृत्यूः०१)
बुलढाणाः ०७ (मृत्यूः ०१)
साताराः ०६ (मृत्यूः ०१)
कोल्हापूर मनपाः ०२
उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, अमरावतीः   प्रत्येकी१ (मृत्यूः ०२ जळगाव व अमरावती)
एकूणः १०१८     मृत्यूः ६४   बरे झालेः ७९

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा