औरंगाबादेत दुपारपर्यंत १६३ कोरोना बाधित रूग्णांची वाढ, ४ रूग्णांचा मृत्यू

0
110

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारपर्यंत १६३ कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९ हजार २२८ वर पोहोचली आहे. तर चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या ३६८ वर पोहोचली आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी ५ हजार ३५५ रूग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या ३ हजार ५०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दुपारपर्यंत म्हणजेच ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत औरंगाबाद महापालिका हद्दीत ९० कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यात मिसारवाडी १३, मिलिंद नगर ११, स्वामी विवेकानंद नगर ७,  नगर नाका ५, एसटी कॉलनी ३, नक्षत्रवाडी ३, अयोध्या नगर १, छावणी १, एकता कॉलनी १, गजानन कॉलनी १, रोजा बाग १, जवाहर नगर १, जुने मुकुंद नगर १, पैठण रोड १, शिवाजी नगर १, श्रेय नगर १, ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, भीम नगर १, नंदनवन कॉलनी १, शेंद्रा एमआयडीसी १, उत्तरा नगरी १, घाटी परिसर १, अशोक नगर, हर्सूल १, जाधववाडी १, जय भवानी नगर १, रमा नगर ४, दत्त नगर १, चेलिपुरा २, पद्मपुरा १, सादात नगर १, भवानी नगर १, क्रांती चौक १, राज नगर १, चित्तेगाव १, मिटमिटा १, बेगमपुरा १, केसरसिंगपुरा १, भीम नगर १, एन चार सिडको १, मिल कॉर्नर १, भोईवाडा, मिल कॉर्नर १, एन नऊ सिडको १, जयसिंगपुरा १  अन्य ६ रूग्ण आहेत.

ग्रामीण भागात ६२ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात पळसवाडी, खुलताबाद ७,  इंद्रप्रस्थ कॉलनी ५, बजाज नगर ५, तेली गल्ली, फुलंब्री ५,  गणेश कॉलनी, सिल्लोड ३, छत्रपती नगर, बजाज नगर ३, राम मंदिर परिसर,म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, साई प्रतिज्ञा, अपार्टमेंट ३,   लासूर स्टेशन २, बोरगाववाडी, सिल्लोड २, घाटनांद्रा, सिल्लोड २, जिकठाण १, बोरगाव, सिल्लोड १, देवरंगारी, कन्नड १, मालपाणी रेसिडन्सी १, रेणुका नगर, शिवाजी नगर १, अयोध्या नगर १, आनंद जनसागर, बजाज नगर १, गंगोत्री पार्क १, स्वस्तिक नगर, बजाज नगर १, लोकमान्य चौक, बजाज नगर १, ओमसाई नगर, रांजणगाव १,प्रताप चौक, बजाज नगर १, सरस्वती सो., १ राधाकृष्ण सो., १,एसटी कॉलनी, बजाज नगर १, म्हसोबा नगर, सिल्लोड १, पळशी, सिल्लोड १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड १, शिक्षक कॉलनी २, टिळक नगर, सिल्लोड १ असे रूग्ण आहेत.

चार कोरोनाबाधितांचा मृत्यूः घाटीत चिकलठाणा, पॉवर लूम येथील ४५ वर्षीय पुरूष, घाटी परिसरातील ७० वर्षीय पुरूष, हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा